Category: दैनिक आरोग्य

  • भात

    भात

    मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, असं सांगितलं जातं, परंतु भात खाणे वाईट नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. म्हणून पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

    मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, भात खाण्याने शरीर फुगते, वजन वाढते अशा प्रकारचा बराच प्रचार आतापर्यंत झालेला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भात खाणे वाईट नाही. ग्लायसेमिक इंडेक्‍स (glycaemia index – GI) म्हणजे एखादा अन्नपदार्थ सेवन केल्यावर दोन तासांमध्ये रक्‍तामध्ये साखर किती प्रमाणात वाढते, याची मोजणी असते. वेगवेगळ्या 233 प्रकारच्या तांदळाची पाहणी केल्यानंतर असे आढळले, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. अनेक प्रकारचे तांदूळ अस्तित्वात असतात. भातामुळे रक्‍तात वाढणारी साखर 48 ते 92 या गुणांमध्ये मोजली जाते. भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाच्या सेवनामुळे 68 ते 74 संख्येपर्यंत साखर वाढते (भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाचा जी.आय. 68 ते 74 आहे), तर सुवर्णा किंवा मसुरी या तांदळांच्या सेवनामुळे साखर वाढण्याचे प्रमाण 55 पेक्षा कमी आहे. हातसडीचा तांदूळ पचायला जरा जड असतो, पण त्यातून जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात. अन्यथा तो पॉलिश केलेल्या तांदळाप्रमाणेच काम करतो. तांदळात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असल्यामुळे भात खाल्ल्यावर मनुष्याने हालचाल करणे म्हणजेच काम करणे आवश्‍यक असते. भात खाऊन नुसते बसून राहिले तर चांगले नसते, असेही निष्पन्न झालेले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र (International Rice Research Institute – IRRI)  आणि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलॅंड या दोन्ही संस्थांनी मिळून केलेले आहे. या संशोधनात असे आढळले आहे, की दहा प्रजातींपासून केलेला भात सेवन केल्यास रक्‍तात साखर वाढण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. चीनमध्ये तयार होणार तांदळाचा जी. आय. 45 इतका कमी आहे, तर लाओसमध्ये तयार होणाऱ्या तांदळाचा जी.आय. 92 आहे.

    ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नाचे पचन सावकाश होते व तो शरीरात सावकाश सावकाश जिरतो, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नापासून थोडी साखर शरीरात सोडली जाते. म्हणून अशा प्रकारचा तांदूळ खाल्ल्यास मधुमेहींसाठी कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नसल्याने खायला हरकत नाही, असा एकूण या संशोधनाचा निष्कर्ष निघाला. तसेही योग्य प्रमाणात तांदूळ-भात खाल्ला तर रक्‍तात साखरेचे प्रमाण वाढत नाही, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

    आयुर्वेदाकडून भातप्रशंसा
    “फॅमिली डॉक्‍टर’ व “सकाळ’च्या वाचकांना, तसेच फॅमिली डॉक्‍टरच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेल्यांना आठवत असेल, की आयुर्वेदाने भात खाण्याची प्रशंसा वेळोवेळी केलेली आहे. ज्या ठिकाणी भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो तेथे, तसेच भात हे मुख्य अन्न असलेल्या चीनमध्ये लोकांचे आरोग्य उत्तम असल्याचे दिसते. (चीनमधील तांदळाचा जी.आय. 45 इतका कमी आहे.) ज्या देशातील लोकांचे किंवा भारतातील ज्या प्रदेशातील लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे त्यांचे आरोग्य गहू वा इतर अन्न खाणाऱ्या लोकांपेक्षा चांगले असलेले दिसते. भात खाणाऱ्यांचा सडसडीतपणा डोळ्यांत भरण्यासारखा असतो. अनेक मंडळींना प्रत्यक्ष विचारल्यानंतर असे दिसून आले, की भात मुख्य अन्न असणाऱ्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा वगैरेंचे वजन कधीच मर्यादेच्या बाहेर नव्हते, त्यांना कधीही स्थूलत्वाचा त्रास झालेला नव्हता. मधुमेह वगैरे तर सोडाच, पण त्यांनी निरामय आरोग्य सांभाळत शंभरी पार केलेली होती.

    तीन महिने, सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे नाश्‍त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत केवळ तांदळाचे पदार्थ सेवन केल्यास आरोग्याचा लाभ होतो हे दाखवून दिले. दही-भात, ताक-भात, वरण-भात, डाळ-भात, मेतकूट-भात, गोड भात, तांदळाची भाकरी वगैरे तांदळाचे वेगवेगळे पदार्थ खाता येतात. त्याबरोबर काही अंशी तांदळापासून बनविलेले पोहेसुद्धा खाता येतात. दही-पोहे खाणारी अनेक मंडळी असतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते. तांदळाच्या कण्यांचा उपमा खाता येतो. तांदळापासून पक्वान्ने बनवूनही खाता येतात. तेव्हा नुसता तांदूळ खायचा म्हटल्यावर आता माझे कसे होणार, याची चिंता करायचे कारण नसावे.

    तांदूळ पचायला सोपा
    संतुलन पंचकर्म व शरीरातील पेशी शुद्ध करण्याच्या चिकित्सेच्या दरम्यान सर्व रोग्यांना (यात हृद्रोगी, मधुमेहाचे रोगीही अंतर्भूत आहेत) सकाळी नाश्‍त्यासाठी साळीच्या लाह्या, दुपारच्या व रात्रीच्या जेवणात भात देण्यात आला. एवढे करून कुणालाही कसलाही त्रास झाला नाही, कुणाचेही कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्‌स वाढले नाही, साखरही वाढली नाही, उलट कमी झाली. अर्थात रोग्यांच्या दिनक्रमात अंतर्स्नेहन, बाह्यस्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती वगैरे उपचार, योग, संगीत वगैरेंचाही समावेश होता. त्यांची कुठल्याही प्रकारे उपासमार केली गेली नाही. त्यांच्या आहारात तांदळाचा समावेश होता.

    तांदूळ हे अधिक पाण्यावर उगवणारे पीक आहे. त्यातल्या त्यात साठ दिवसांत तयार होणारा तांदूळ पचायला अधिक सोपा असतो. तांदूळ भाजून घेऊन त्यापासून केलेला भात पचायला सोपा असतो व कुठलाही त्रास न होता त्यापासून सहज शक्‍ती मिळते. भात शिजवण्यासाठी वा डाळ-तांदळाची खिचडी बनवताना फारसे कौशल्य असण्याची गरज नसते.

    या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर भात खाण्याचा प्रयोग करून पाहावा व प्रकृतीत सुधारणा अनुभवावी, आनंद मिळवावा.

    तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

    तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा. बहुतेक सर्व रोगांमध्ये तांदूळ हा पथ्यकारक म्हणून सांगितला आहे. आयुर्वेदाने भाताचा नेहमीच आग्रह धरला आहे.

    जगात सर्वत्र मिळणारे आणि अन्न म्हणून सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. जगभरात सुमारे 40हजार जातींचे तांदूळ होतात. भारतामध्येही तांदळाच्या पारंपरिक अनेक जाती आहेत. बासमती, आंबेमोहोर, सोना मसुरी, कोलम वगैरे भाताची नावे बहुतेकांच्या परिचयाची असतात; मात्र याखेरीज साठेसाळ, रक्‍तसाळ, चंपा, चंपाकळी, जिरगा, काळी गजरी वगैरे अनेक जाती असतात. बासमती, आंबेमोहोर भात सुगंधामुळे अधिक प्रचलित असला तरी साठेसाळ, रक्‍तसाळ वगैरे पारंपरिक तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतो. उदा. रक्‍तसाळ भातात लोह अधिक प्रमाणात असते, साठेसाळ भात पचण्यासाठी अतिशय सोपा असतो. जिरगा, काळी गजरी वगैरे भात रुग्णांसाठी विशेष हितकर असतो.

    आयुर्वेदात तांदळाची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. तांदूळ तयार झाल्यावर वर्षभर साठवून मग खाण्यासाठी वापरावा असेही सांगितलेले आहे. बहुतेक सर्व रोगांमध्ये अशा प्रकारच्या जुन्या तांदळाचा पथ्य म्हणून उल्लेख केलेला सापडतो. वेदांमध्येही तांदळाचा उल्लेख सापडतो. भारतीय संस्कृतीनुसार यज्ञ, पूजा, लग्नकार्यात तांदळाचा उपयोग केला जातोच, पण जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये तांदूळ हे भरभराटीचे, समृद्धीचे व वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते.

    “भावप्रकाश’ या आयुर्वेदाच्या ग्रंथात तांदळाच्या काही मुख्य जातींचा उल्लेख याप्रमाणे केलेला आहे, रक्‍तशाली, सकलम, पांडुक, शकुनाहृत्‌, सुगंधक, कर्दमक, महाशाली, दूषक, पुष्पांडक, पुंडरीक, महिष, मस्तक, दीर्घशूक, कांचनक, हायन, लोध्रपुष्पक. मात्र, विस्तारभयामुळे सर्व जातींचा निर्देश करणे शक्‍य नाही असे याच्यापुढे म्हटलेले असल्याने प्रत्यक्षात त्या वेळीही यापेक्षा अनेक जाती अस्तित्वात होत्या, हे समजते.

    तांदळाचे गुणधर्म
    तांदळाचे गुणधर्म व उपयोग पुढीलप्रमाणे सांगितले आहेत,
    शालयोः मधुराः स्निग्धा बल्या बद्धाल्पवर्चसः ।
    कषाया लघवो रुच्या स्वर्या वृष्याश्‍च बृंहणाः ।।
    अल्पानिलकफाः शीताः पित्तघ्ना मूत्रलास्तथा । …भावप्रकाश

    तांदूळ चवीला गोड, गुणाने स्निग्ध व वीर्याने थंड असतात, बल वाढविणारे व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात, स्वरासाठी हितकर असतात. शुक्रधातूला वाढवितात, इतर धातूंचेही पोषण करतात, पित्तशमन करतात, थोड्या प्रमाणात वात-कफाला वाढवतात, पचण्यास सोपे असतात, तसेच लघवी साफ होण्यासही मदत करतात.

    हे झाले सामान्य तांदळाचे गुण. मात्र, सर्व तांदळांत साठेसाळी तांदूळ श्रेष्ठ आहेत, असे सांगितले आहे. हे तांदूळ साठ दिवसांत तयार होतात व त्यांचे गुण या प्रकारे असतात.

    षष्टिकाः मधुराः शीता लघवो बद्धवर्चसः ।
    वातपित्तप्रशमनाः शालिभिः सदृशा गुणैः ।। …भावप्रकाश

    चवीला मधुर, वीर्याने शीतल व पचायला हलके असतात, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात. वात तसेच पित्तदोषाचे शमन करतात; ताकद देतात, तसेच तापात हितकर असतात.

    रक्‍तशाली म्हणजे लाल रंगाचे तांदूळ. यांची विशेषता अशी, की ते डोळ्यांसाठी चांगले असतात.

    रक्‍तशालिर्वरस्तेषु बल्यो वर्ण्यस्त्रिदेषजित्‌ ।
    चक्ष्युष्यो मूत्रलः स्वर्यः शुक्रलस्तृङज्वरापहा ।।
    विषव्रणश्‍वासकासदाहनुत्‌ वपिष्टिदः । …भावप्रकाश

    सर्व तांदळांपैकी रक्‍तसाळ तांदूळ डोळ्यांना हितकर असतात, ताकद वाढवितात, कांती सुधरवतात व तिन्ही दोषांना संतुलित ठेवतात; आवाजासाठी हितकर असतात, लघवी साफ होण्यास मदत करतात, शुक्रवर्धन करतात. तहान, ताप, विष, व्रण, दमा, खोकला, दाह यांचा नाश करतात व अग्नीची पुष्टी करतात.

    विविध जातींच्या तांदळाचे अंगभूत गुण याप्रमाणे सांगितले आहेत; मात्र, तांदूळ कशा प्रकारे उगवले आहेत यावरही त्यांचे गुणधर्म बदलतात.
    अगोदर जाळून घेतलेल्या जमिनीमध्ये लावलेले तांदूळ किंचित तुरटसर चवीचे व पचायला सोपे असतात. हे तांदूळ मल-मूत्र विसर्जनास मदत करतात, कफनाशक असतात.
    नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ विशेषतः शुक्रवर्धक असतात आणि तुलनेने कमी हलके असतात, धारणाशक्‍ती वाढवितात, ताकद देतात, या तांदळापासून मलभाग फारसा तयार होत नाही.
    अजिबात न नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ वात वाढवितात.
    आपोआप उगवलेले म्हणजे मुद्दाम पेरणी न करता आलेले तांदूळ गुणाने कमी प्रतीचे असतात.
    एकदा आलेल्या तांदळाच्या लोंब्या कापून घेऊन त्याच फुटीवर पुन्हा आलेले तांदूळ गुणांनी रुक्ष असतात, पित्त वाढवितात व मलावबंध करतात.

    मधुमेहीनो, भात खा!
    अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने, नीट पेरणी, मशागत करून उगवलेले तांदूळ वर्षभरानंतर वापरणे अतिशय आरोग्यदायी आहे, हे सहज लक्षात येते.
    मधुमेही व्यक्‍तींनी, वजन जास्त असणाऱ्यांनी भात खाऊ नये असा प्रचार बऱ्याचदा केला जातो; मात्र, आयुर्वेदातील पुढील संदर्भावरून यामध्ये अजिबात तथ्य नाही, हे स्पष्ट होते.
    मधुमेहावरचे औषध खाल्ल्यानंतर तूप व भात खावा असे सांगितले आहे,

    सुभावितं सारजलैला हि पिष्ट्‌वा शिलोद्‌भवाः ।
    शालिं घृतैश्‍च भुञ्जानः ।। …रसरत्नाकर

    चंदनाच्या पाण्यात वेलची व शुद्ध शिलाजित टाकून घ्यावे व वर तूप-भात खावा.
    मधुमेही व्यक्‍तीसाठी पथ्यकर पदार्थ सांगताना म्हटले आहे,
    यवान्नविकृर्तिमुद्‌गाः शस्यन्ते शालिषष्टिकाः । …रसरत्नाकर

    जवापासून बनविलेले पदार्थ, मूग, तांदूळ, विशेषतः साठेसाळीचे तांदूळ मधुमेही व्यक्‍तींसाठी हितकर आहेत.
    स्थूलता कमी करण्यासाठीसुद्धा तांदळाचा आधार घेतलेला आहे.

    उष्णमत्रस्य मण्डं वा पिबन्‌ कृशतनुर्भवेत्‌ ।
    भैषज्य रत्नावली

    रोज सकाळी तांदळाची मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्‍ती कृश होते.
    स्थूल व्यक्‍तीसाठी हितकर काय आहे सांगताना तांदळाचा उल्लेख केलेला आहे.

    पुराणशालयो मुद्गकुलत्थयवकोद्रवाः ।
    लेखना बस्तयश्‍चैव सेव्या मेदस्विना सदा ।। …भैषज्य रत्नावली

    एक वर्ष जुने तांदूळ, मूग, कुळीथ, यव, कोद्रव (एक प्रकारचे धान्य), लेखन (मेद कमी करणाऱ्या औषधांनी संस्कारित तेलाची वा काढ्याची बस्ती, हे मेदस्वी व्यक्‍तीने नित्य सेवन करण्यास योग्य आहे.

    तांदूळपाण्याचे अनुपान
    तंडुलोदक म्हणजे तांदळाचे पाणी हे अनुपान म्हणूनही वापरले जाते. बारीक कांडलेले तांदूळ आठपट पाण्यात भिजत घालावेत, 15-20 मिनिटांनी हातांनी कुस्करून गाळून घ्यावेत. हे तंडुलोदक अतिशय तहान लागणे, उलटी, मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित न होणे, आव, जुलाब वगैरे रोगांमध्ये उपयोगी असते. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अति रक्‍तस्राव होणे, वारंवार पाळी येणे वगैरे तक्रारींवर द्यायचे औषध तंडुलोदकाबरोबर दिल्यास अधिक लवकर व चांगला गुण येतो.

    तांदळापासून बनविलेल्या साळीच्या लाह्या आम्लपित्त, उलटी, जुलाब वगैरे तक्रारींवर औषधाप्रमाणे उपयोगी असतात.

    पिंडस्वेदन या विशेष उपचारासाठी औषधी काढ्यात तांदूळ शिजवला जातो व असा भात पुरचुंडीत बांधून मसाज करण्यासाठी वापरला जातो. काही वातशामक लेपसुद्धा तांदळाच्या पेजेमध्ये मिसळून लावायचे असतात.

    अशा प्रकारे तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. तेव्हा रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा.

  • सौंदर्य

    सौंदर्य

    सौंदर्य हा नैसर्गिक भाव असल्याने निसर्गाला धरून केलेल्या उपचारांचा व उपायांचा खरा फायदा होणार आहे हे विसरून चालणार नाही. क्षणिक सौंदर्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर त्यातून नुकसान होईल, हे सहज ध्यानात येऊ शकेल. म्हणून सौंदर्यरक्षणामध्ये नैसर्गिक द्रव्ये, वनस्पती, सकस आहार, संतुलित जीवनशैली यांचे महत्त्वाचे योगदान असते.

    सौंदर्याची ओढ, सौंदर्याची आवड कोणाला नसते? स्त्री असो वा पुरुष, सर्वांनाच सौंदर्य व पाठोपाठ येणारी आकर्षकता हवीहवीशी वाटणे अगदी स्वाभाविक आहे. प्राचीन काळातही देवदेवतांपासून, राजकन्येपर्यंत अगदी आश्रमात राहणाऱ्या एखाद्या ऋषीकन्येपर्यंत सर्वांनीच सौंदर्य टिकवण्यासाठी, खुलविण्यासाठी प्रयत्न केलेले दिसतात. भारतासारख्या प्राचीन संस्कृतीचा वारसा असणाऱ्या देशात तर सौंदर्यसाधनेला सांस्कृतिक स्थान मिळाल्याचे दिसते. काळानुसार, देशानुसार, हवामानानुसार सौंदर्याची मोजमापे बदलली तरी एकंदरीत सौंदर्याची ओढ आणि महत्त्व कायम आहे. जन्मजात सौंदर्याची देणगी सर्वश्रेष्ठ असतेच, पण सौंदर्य टिकवणे आणि खुलवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. नितळ त्वचा, सतेजता, गडद रंगाचे रेशमी, लांब केस, चेहऱ्याचा रेखीवपणा, उत्तम बांधा तसेच ओठ कोरडे नसणे, घाम अति प्रमाणात न येणे, उंची व बांधा यांचे प्रमाण योग्य असणे, शरीराला आवश्‍यक घट्टपणा, कणखरपणा असणे या सर्व गोष्टी सौंदर्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत. सौंदर्य हा नैसर्गिक भाव असल्याने निसर्गाला धरून केलेल्या उपचारांचा व उपायांचा खरा फायदा होणार आहे हे विसरून चालणार नाही. क्षणिक सौंदर्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष होणार असेल तर त्यातून नुकसान होईल हे सहज ध्यानात येऊ शकेल. म्हणून सौंदर्यरक्षणामध्ये नैसर्गिक द्रव्ये, वनस्पती, सकस आहार, संतुलित जीवनशैली यांचे महत्त्वाचे योगदान असते.

    त्वचा
    त्वचा हा व्यक्‍तीचा खरा दागिना समजला जातो.
    क्षीरस्य संतानिका इव सप्त त्वचो भवति ।…सुश्रुत शारीरस्थान
    ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते त्याप्रमाणे शरीर तयार होताना, धातूंचे पचन होत असताना त्वचा तयार होते.
    म्हणूनच सतेज त्वचेसाठी एकंदर आरोग्य चांगले राहणे, सर्व धातूंचे व्यवस्थित पोषण होणे हे सुद्धा महत्त्वाचे होय. निरोगी त्वचेसाठी पुढील प्रयत्न करता येतात.
    – धातूंचे पोषण व्हावे, शरीराला तसेच त्वचेलाही आवश्‍यक स्निग्धता मिळावी आणि नितळ, सतेज त्वचा मिळावी म्हणून नियमित अभ्यंग करणे उत्तम होय. रक्‍तशुद्धिकर व वात-पित्तशामक औषधांचा संस्कार करून तयार केलेले ‘अभ्यंग तेला’सारखे तेल अंगाला लावणे उत्तम असते.
    – त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचा कोरडी पडणे हे त्वचेला घातक ठरू शकते. यावरही नियमित अभ्यंग करण्याचा आणि स्नानाच्या वेळी मसुराच्या पिठात हळद, धणे पूड, दही किंवा दूध मिसळून तयार केलेले उटणे किंवा तयार “सॅन मसाज पावडर’सारखे उटणे लावण्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
    – गुलाबपाण्यात चंदन, दालचिनी, हळकुंड उगाळून तयार केलेले गंध चेहऱ्यावर लावण्याने सुरकुत्यांना प्रतिबंध होतो तसेच त्वचा नितळ व सतेज राहण्यास मदत होते.
    – चेहरा किंवा दंड-पाठीवर पिंपल्स येणे सुद्धा सौंदर्याला बाधक असते. यावर रक्‍तशुद्धिकर द्रव्यांनी सिद्ध केलेले “रोझ ब्युटी तेला’सारखे तेल लावण्याचा, “सॅन पित्त फेस पॅक’सारखा पॅक लावण्याचा उपयोग होतो.
    – चेहरा व हातापायाच्या पंजांची त्वचा अधिकच नाजूक व संवेदनशील असते. शिवाय पाणी, धूळ, धूर, उन्हाच्या संपर्कात हे भाग अधिक प्रमाणात येत असल्याने या ठिकाणच्या त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्‍यक असते. त्या दृष्टीने आठवड्यातून एक – दोन वेळा चेहऱ्यावर, पंजांवर साय लावून ठेवणे उत्तम असते. रात्री झोपण्यापूर्वी “रोझ ब्युटी तेला’सारखे तेल लावण्यानेही या ठिकाणच्या नाजूक त्वचेचे संरक्षण होऊ शकते.
    – तळहात कोरडे होणे, कडक होणे हा समस्या अनेकांना असते. लिंबाच्या रसात मध टाकून तयार केलेले मिश्रण हातांना लावून ठेवण्याचा उपयोग होऊ शकतो.

    डोळे
    डोळे सुद्धा सौंदर्याचा विचार करताना डोळे महत्त्वाचे होत. डोळ्यांमधली चमक व सतेजता आरोग्याशिवाय मिळू शकत नाही. डोळे सुंदर दिसावेत म्हणून वापरलेली प्रसाधने नैसर्गिक नसल्याने डोळ्यांच्या आरोग्याला व सौंदर्याला बऱ्याचदा घातक ठरू शकतात. त्याऐवजी सर्व नैसर्गिक, शुद्ध व उत्तम प्रतीच्या द्रव्यांपासून आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले अंजन (उदा. सॅन अंजन काळे, ग्रे किंवा क्‍लिअर) वापरण्याने डोळ्यांचे आरोग्यही उत्तम राहते, शिवाय डोळ्यांचे प्रसाधनही होते.

    – संगणक, प्रदूषण वगैरेंमुळे थकलेल्या डोळ्यांना पुन्हा स्फूर्ती यावी यासाठी बंद डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या किंवा निरशा थंड दुधाच्या घड्या ठेवता येतात.

    दात, केस, नखे
    दात, केस, नखे यांची निगा राखणे हे सुद्धा सौंदर्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. हे तिन्ही शरीरघटक शरीरातील अस्थिधातूंशी संबंधित असतात. दूध, डिंक, खारीक, खसखस वगैरे घटकांचा रोजच्या आहारात समावेश करण्याने यांचे आरोग्य व सौंदर्य हे दोन्ही सुरक्षित राहतात.

    – दात-हिरड्यांना उपयुक्‍त द्रव्यांनी संस्कारित केलेल्या “सुमुख तेला’सारख्या तेलाच्या गुळण्या धरणे, दात घासण्यासाठी नैसर्गिक द्रव्यांचा वापर करणे उत्तम होय.
    – पाण्यात काम, घरकाम केल्याने नखांच्या कडेची त्वचा रुक्ष होऊन निघू शकते. यावर दुधावरची साय वा लोणी हलक्‍या हाताने जिरविण्याचा उपयोग होतो.
    – केस मऊ व रेशमी होण्यासाठी आठवड्यातून एकदा केसांना नारळाचे दूध लावून नंतर केस शिकेकाई, रिठा वगैरे मिश्रणाने धुण्याचा उपयोग होतो.

    – जास्वंदीची फुले, काड्या व पाने बारीक करून तयार केलेला लेप केसांना लावल्याने केसांचे कंडिशनिंग करता येते.
    – ओठ कोरडे होऊ नयेत म्हणून ओठांना शतधौतघृत किंवा दुधावरची साय लावण्याचा उपयोग होतो.
    – घाम अति प्रमाणात येणे हे पित्तदोष वाढल्याचे लक्षण असू शकते, त्यामुळे गुलकंद, पित्तशांतीसारखी पित्तशामक औषधे घेण्याचा उपयोग होतोच पण घरच्या घरी कुळथाचे पीठ, जिरे पूड , लिंबाचा रस तसेच नागरमोथा, लोध्र वगैरे वनस्पती टाकून तयार केलेले उटणे लावण्याचा उपयोग होतो.
    – काखेत वगैरे ज्या ठिकाणी घाम अधिक प्रमाणात येतो तेथे स्नानानंतर तुरटीचा खडा फिरविण्याचा उपयोग होतो.

    बांधा हा सुद्धा सौंदर्यामध्ये महत्त्वाचा असतो. स्त्रियांचा कमनीय बांधा, पुरुषांची भरदार छाती व एकंदर कणखरपणा टिकण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. या विषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या वेळेला पाहू. तसेच सौंदर्यप्रसाधनांच्या वापराने मिळविलेले सौंदर्य आणि आतून उत्स्फूर्तपणे मिळविलेले सौंदर्य यात मोठा फरक असतो. पंचकर्माच्या साहाय्याने शरीरशुद्धी करून आतून सौंदर्य कसे मिळविता येते हेही आपण पुढच्या वेळेला पाहू.

  • व्यावसायिक आरोग्य

    व्यावसायिक आरोग्य

    व्यवसाय वा नोकरी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. म्हणूूनच त्याचा आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. काळाप्रमाणे व्यवसायाचे स्वरूप बदलत जाणे स्वाभाविक आहे पण प्रकृतीनुसार व्यवसाय निवडणे आणि व्यवसायानुसार प्रकृतीची काळजी घेणे आवश्‍यक होय.
    आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये पूर्वीच्या काळाला अनुसरून घोड्यावर बसल्याने काय होते, अग्नीजवळ काम करण्याने काय होते, उन्हात राहण्याने काय होते वगैरे विषयांचे मार्गदर्शन केलेले आहे. उदा.
    घोटकारोहणं वातपित्ताग्निश्रमकृन्ममतम्‌ ।
    मेदोवणर्कफघ्नं च हितं तद्‌ बलिनां परम्‌ ।।
    … योगरत्नाकर
    घोडा चालवणे हे वात-पित्त दोषांना वाढविणारे, अग्नी प्रदीप्त करणारे पण श्रम उत्पन्न करणारे असते; तसेच मेद, वर्ण व कफ यांचा नाश करणारे असते. म्हणूून घोड्यावरून प्रवास करणे हे केवळ बलवान मनुष्यासाठी हितकर होय.
    आधुनिक जीवनशैलीमध्ये घोड्यावर बसण्याची पाळी क्वचितच येत असली तरी अशा प्रकारच्या मार्गदर्शनावरून आधुनिक व्यवसाय करताना आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी हे समजून घेता येऊ शकते. एकंदरीत आयुर्वेदशास्त्रात व्यवसायिक आरोग्याचा विचार करावा लागतो हे समजते.
    प्रकृती व व्यवसायाचा विचार करणेही या ठिकाणी आवश्‍यक आहे. प्रकृतीचा आपल्या आवडीनिवडी, एकंदर शरीरशक्‍ती व प्रवृत्ती यांच्यावर मोठा प्रभाव असतो. व्यवसाय आवडीचा असला, स्वतःच्या स्वभावाला एकंदर प्रकृतीला साजेसा व अनुकूल असला तर त्यामुळे आरोग्य चांगले राहतेच पण व्यवसायातही प्रवीणता, कार्यक्षमता उत्तम राहते.
    व्यवसाय बैठ्या स्वरूपाचा व धावपळीचा अशा दोन प्रकारचा असू शकतो.
    कफ हा स्वभावतःच शांत, स्थिर, उत्तम बलयुक्‍त आणि उत्तम सहनशक्‍ती असणारा असल्याने धावपळ, प्रवास, ताण-तणावांनी युक्‍त व्यवसाय कफपकृतीच्या व्यक्‍ती निभावून नेऊ शकतात. मात्र वात-पित्त हे स्वभावतःच चंचल, तापट, नाजूक व संवेदनशील असल्याने अशा प्रकृतीच्या व्यक्‍तींसाठी फारसे ताणतणाव नसणारा, शांत व स्थिर स्वरूपाचा व्यवसाय अधिक योग्य असतो.
    आपल्या प्रकृतीला अनुरूप व्यवसाय निवडणे शक्‍य असले तर ते सर्वोत्तम होय. पण प्रत्येक व्यक्‍तीला ते शक्‍य होईलच असे नाही. अशा वेळी आपल्या व्यवसायाचे स्वरूप, आपल्या प्रकृतीचे स्वरूप आणि व्यवसायामुळे प्रकृतीवर होणारा परिणाम यांची माहिती करून घ्यायला हवी व तो आरोग्यासाठी प्रतकूल ठरणार नाही यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करायला हवी.
    सध्याच्या युगात संगणकावर काम करणारी असंख्य मंडळी असतात. मुख्य म्हणजे हे बैठ्या स्वरूपाचे काम असते. यात डोळ्यांवर अतिताण येणे साहजिक असते. प्रखर स्क्रीनच्या सान्निध्यात राहण्याने डोळ्यांमध्ये त्यांच्यामार्फत व संपूर्ण शरीरात उष्णता वाढत असते. संगणकावर काम करताना विशिष्ट रीतीने बसावे लागत असल्याने मान व पाठीवर ताण येत असतो. तसेच की बोर्ड व माऊस याच्या वापराने खांदे, हात, बोटे, मनगट यांच्यावर परिणाम होत असतो. शिवाय संगणकावर काम करणे हे बुद्धीला ताण देणारे व मेंदूला सतत व्यस्त ठेवणारे असते. या सर्व गोष्टींचा विचार करता संगणकावर काम करणाऱ्यां व्यक्‍तींना खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.
    * उष्णता कमी करणे, विशेषतः डोळ्यांची काळजी घेणे
    * यासाठी पादाभ्यंग उत्तम असतो.
    पादाभ्यंगस्तु सुस्थैर्यनिद्रादृष्टिप्रसादकृत्‌ ।।
    … योगरत्नाकर
    पादाभ्यंगामुळे शरीरात स्थिरता उत्पन्न होते, झोप येण्यास मदत मिळते व मुख्य म्हणजे नजर प्रसन्न होते. पादाभ्यंग घृत तळपायाला लावून काशाच्या वाटीच्या साहाय्याने पादाभ्यंग करण्याने शरीरातील उष्णताही कमी होते.
    * मौक्‍तिकभस्म, त्रिफळा घृत वगैरे डोळ्यांना हितकर द्रव्यांपासून तयार केलेले अंजन, उदा. “सॅन अंजन (क्‍लिअर किंवा ग्रे)’ डोळ्यात घालण्यानेही डोळ्यांवरचा ताण कमी होतो.
    * खांदे व पाठीची काळजी घेणे – मानेचे व पाठीचे व्यायाम उत्तम असतात तसेच नियमितपणे “संतुलन कुंडलिनी तेला’सारखे नसांना पोषक तेल लावण्यानेही उत्तम उपयोग होताना दिसतो.
    * बुद्धीची व मेंदूची काळजी घेणे – बुद्धी-मेंदूला पोषक असे पंचामृत व साजूक तूप यांचा रोजच्या आहारात समावेश करता येतो. एकाग्रता वाढावी, मेंदूची कार्यक्षमता वाढावी व मुख्य म्हणजे मेंदूवरचा ताण कमी व्हावा यासाठी नेमाने ॐकार गूंजन, अनुलोम-विलोम, संतुलन अमृत क्रिया यांचा अवलंब करण्याचा उपयोग होताना दिसतो.
    प्रवास आणि आरोग्य
    आधुनिक काळात “प्रवास’ हाही व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग होय. रोजच्या रोज गाडीतून वा रेल्वेतून प्रवास करणे, वारंवार देशातल्या देशात वा देशाबाहेर विमानाने प्रवास करणे असे प्रवासाचे अनेक प्रकार असू शकतात.
    प्रवासामुळे वात वाढतो असे आयुर्वेदशास्त्र सांगते. विशेषतः सातत्याने प्रवास करण्याने व दूरदेशीचे प्रवास करण्याने हवा, पाणी, तापमान यांच्यात मोठे बदल होत असल्याने वात वाढण्याबरोबरच पचनसंस्थेवर ताण येतो, शरीरशक्‍ती कमी होते. प्रवास करणाऱ्यांनी खालील गोष्टी सांभाळण्याचा उपयोग होतो,
    * वातशमनासाठी प्रयत्न करणे – यात अंगाला नियमित अभ्यंग करणे, नाकात साजूक तुपाचे किंवा औषधांनी सिद्ध केलेल्या”नस्यसॅन घृता’ सारख्या सिद्ध घृताचे थेंब टाकणे.
    शक्‍य असेल तेव्हा तज्ज्ञ आयुर्वेदिक परिचारकाकाडून शास्त्रोक्‍त पद्धतीने अभ्यंग व स्वेदन करून घेणे.
    * पचनाची काळजी घेणे – प्रवासामुळे अन्न आणि जागा बदलली तरी शक्‍यतोवर जेवणाच्या वेळा सांभाळण्याचा खूप उपयोग होतो. प्रवासामुळे पचनावरचा ताण कमी होण्यासाठी जेवणानंतर “संतुलन अन्नयोग गोळ्या’ किंवा अविपत्तिकर चूर्णासारखे पाचक चूर्ण घेता येते. जेवण प्रकृतीला अनुकूल व पचायला हलके असण्याकडे लक्ष देणेही उत्तम असते.
    * प्रवासामध्ये सर्वाधिक लक्ष द्यावे लागते ते पाण्याकडे. पाणी बदलले तरी पचन बिघडण्याचा सर्वाधिक संभव असतो. त्यामुळे शक्‍यतो प्रवासातही उकळलेले
    पाणी पिण्याकडे लक्ष द्यावे.
    * नियमित प्रवास करणाऱ्यांनी वातशमनासाठी आणि पचन व्यवस्थित राहण्यासाठी अधून मधून अनुवासन बस्ती घेण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो.
    रात्रपाळी आणि आरोग्य
    रात्रपाळीचा व्यवसाय हा सर्वात अवघड व्यवसाय समजावा लागतो. निसर्गाच्या विरोधात जाऊन कराव्या लागणाऱ्या या व्यवसायामुळे वात तसेच पित्त असे दोन्ही दोष असंतुलित होतात, पचनसंस्थेवर ताण येतो तसेच हळूहळू शरीरशक्‍तीही कमी कमी होत जाते. त्यातल्या त्यात कफप्रकृत्तीसाठी असा व्यवसाय सहन होऊ शकला तरी त्यांनीही प्रकृतीची खूप काळजी घ्यावीच लागते. रात्रपाळी करावी लागणाऱ्यांना खालील गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे,
    * झोपण्यापूर्वी अविपत्तिकर चूर्ण किंवा “सॅनकूल चूर्णा’सारखे चूर्ण घेणे. यामुळे पचनसंस्थेतील वाढलेल्या पित्ताचे शमन होते.
    * स्नानाच्या पूर्वी अंगाला अभ्यंग करण्याने वाढलेला वात संतुलित होण्यास मदत मिळते तसेच शरीरशक्‍ती भरून येण्यास उपयोग होतो.
    * सकाळी गुलकंद, मोरावळा, “संतुलन पित्तशांती’सारख्या गोळ्या घेण्याने पित्त कमी होते.
    * आहारात साजूक तूप, लोणी, पंचामृत यांचा समावेश करण्यानेही वात-पित्तदोषांचे शमन होऊन शरीरशक्‍ती चांगली राहण्यास मदत मिळते.
    * पादाभ्यंग करण्याने अतिरिक्‍त उष्णता कमी होते.
    बैठे काम आणि आरोग्य
    अनेकांचा बैठ्या स्वरूपाचा व्यवसायही असतो. अशा लोकांना नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घेणे इष्ट असते.
    * बसून बसून पाठ-मानेत विकार उत्पन्न होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे लागते. त्यासाठी मान-पाठीचे विशेष व्यायाम करण्याचा, आठवड्यातून दोन-तीन वेळा पाठीला व मानेला “संतुलन कुंडलिनी तेल’ लावण्याचा उपयोग होताना दिसतो.
    * या व्यक्‍तींनी रात्रीचे जेवण अगदी हलके घेणे चांगले असते.
    * दुपारची झोप टाळणे हितावह असते.
    * बसून बसून मन व बुद्धी कंटाळले तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तंबाखू किंवा वारंवार चहा-कॉफी पिण्याची, सतत काही खाण्याची सवय लागू शकते. यातून नंतर अजूनच नुकसान होणार असते हे लक्षात ठेवणे चांगले.
    बोलणे आणि आरोग्य
    काही व्यवसायात सातत्याने बोलणे हा एक मुख्य भाग असतो. डॉक्‍टर, वकील, शिक्षक वगैरे व्यवसायात तर बोलणे महत्त्वाचे असते. बोलण्याने शक्‍तीचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने अति प्रमाणात बोलणे हे “साहस’ म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने अहितकर सांगितले आहे.
    * व्यवसायामुळे फार बोलावे लागणाऱ्या व्यक्‍तींनी सकाळी च्यवनप्राश, धात्री रसायन किंवा “सॅनरोझ’सारखे रसायन सेवन करण्याची सवय ठेवावी
    * आठवड्यातून एक-दोन वेळा हळद-मीठ टाकलेल्या गरम पाण्याच्या गुळण्या करण्याचा उपयोग होताना दिसतो.
    * दिवसभर थोडे थोडे पाणी पिण्याचाही फायदा होताना दिसतो.
    थोडक्‍यात, प्रत्येकाने आपापल्या व्यवसायानुरूप व प्रकृतीनुरूप आहार-आचरणात योग्य ते बदल केले, आवश्‍यक त्या औषध-रसायनांचा उपयोग करून घेतला तर त्यातून आरोग्य टिकवता येईल व कामाची प्रतही वाढवता येईल.

  • मुलांचा आहार

    मुलांचा आहार

    लहान मुलांच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असते ते आहाराचे. लहान मुलांच्या बाबतीत आहाराची योजना अतिशय कुशलतेने करावी लागते कारण तो एका बाजूने पौष्टिक तर असायला हवाच पण दुसऱ्या बाजूने मुलांना आवडायलाही हवा.

    सर्वसाधारणपणे चार-पाच वर्षांपर्यंत मुलांचे खाणे घरीच असते. मग मात्र शाळेला सुरुवात झाली की “डबा’ सुरू होतो. डबा आवडीचा नसला तर तसाच्या तसा परत येतो, असाही अनेक आयांचा अनुभव असतो. अर्थात आवडनिवड तयार होण्यामागे बऱ्याचशा प्रमाणात पालकच जबाबदार असतात. आतापर्यंतचा अनुभव आहे की “गर्भसंस्कार’ झालेल्या मुलांमध्ये खाण्या-पिण्याच्या तक्रारी वा अवाजवी आवडी-निवडी दिसत नाहीत. विशेषतः गर्भवती स्त्रीने गर्भारपणात जो काही आरोग्यदायी आहार घेतला असेल, ज्या पौष्टिक गोष्टी नियमितपणे खाल्ल्या असतील त्यांची आवड उपजतच मुलांमध्ये तयार झालेली असते. नंतरही मुलाला सहा महिन्यानंतर स्तन्याव्यतिरिक्‍त इतर अन्न देण्याची सुरुवात होते, त्यावेळेला मुलाची “चव’ तयार होत असते. तेव्हापासून मुलाला सकस, आरोग्यदायी अन्नाची सवय लावणे आपल्याच हातात असते. लहान मुलांचा शारीरिक, बौद्धिक विकास झपाट्याने होत असतो, विकासाच्या या वेगाला पोषक व परिपूर्ण आहाराची जोड असावीच लागते.

    आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगायचे झाले तर मुलांमध्ये रक्‍त, मांस, अस्थी आणि मज्जाधातूंचे पोषण व्यवस्थित होते आहे याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. संपूर्ण शरीराला, सर्व शरीरावयवांना प्राणशक्‍तीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी रक्‍तधातू महत्त्वाचा असतो. शरीर घडण्यासाठी, मूळ शरीरबांधा तयार होण्यासाठी व स्टॅमिना वाढविण्यासाठी मांसधातू आवश्‍यक असतो. उंची वाढण्यासाठी व कणखरपणा येण्यासाठी अस्थिधातू नीट तयार व्हावा लागतो आणि बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी मज्जाधातूचे पोषण होणे गरजेचे असते. मुलांच्या एकंदर आहाराची योजना करताना तसेच डबा तयार करताना या साऱ्याचा विचार करायला हवा.

    रक्‍तधातुपोषक – केशर, मनुका, सुके अंजीर, डाळिंब, काळे खजूर, काळे ऑलिव्ह, सफरचंद, पालक, गूळ

    मांसधातुपोषक – दूध, लोणी, सुके अंजीर, खारीक; मूग, तूर डाळ; मूग, मूग, मटकी, मसूर, चणे वगैरे कडधान्ये

    अस्थिधातुपोषक – दूध, गहू, खारीक, डिंक, खसखस, नाचणी सत्त्व

    मज्जाधातुपोषक – पंचामृत, लोणी, तूप, बदाम, अक्रोड, जर्दाळू

    याशिवाय, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी वगैरे तृणधान्ये; मूग, तूर, मसूर, चणा वगैरे कडधान्ये; द्राक्षे, शहाळी, ओला नारळ, गोड मोसंबी, पपई, आंबा वगैरे ऋतुनुसार उललब्ध असणारी ताजी व गोड फळे; ताज्या भाज्या; काकडी, गाजर वगैरे कोशिंबिरी; दूध, लोणी, तूप वगैरे स्निग्ध पदार्थ; मध वगैरे गोष्टी मुलांच्या आहारात असायला हव्यात.

    मुले शारीरिक दृष्ट्या चपळ असतात. त्यांची सातत्याने काही तरी मस्ती, पळापळ चालू असते. म्हणूनच मुलांना दोन जेवणांव्यतिरिक्‍त काहीतरी खावेसे वाटणे साहजिक आहे. अर्थात एकसारखे “चरत’ राहण्याची सवय चांगली नसली, तरी भूक लागेल तेव्हा मुलांना काहीतरी चविष्ट सकस पदार्थ द्यायला हवेत. त्यादृष्टीने दाण्याची चिक्की, डाळीची चिक्की, गव्हाच्या पिठापासून बनविलेली सुकडी, खांडवी, राजगिऱ्याची वडी, तांदळाच्या पिठाची धिरडी, लाल भोपळ्याचे घारगे, थालिपीठ, फोडणीचा ताजा भात, वाफवलेल्या कडधान्यांची कोशिंबीर वगैरे पदार्थ देता येतात.

    मुलांच्या आहारावर त्यांचा नुसता शारीरिकच नाही तर मानसिक व बौद्धिक विकासही अवलंबून असतो, त्यांच्यातील कल्पकता, सृजनता, चौकस वृत्तीला खतपाणी द्यायचे असेल तर संतुलित व परिपूर्ण आहाराचे योगदान महत्त्वाचे असते हे लक्षात घ्यायला हवे.

    आजकाल बरीच मुले घरातल्या इतर व्यक्‍तींचे पाहून लहान वयातच चहा-कॉफी पिऊ लागतात. कोकोपासून बनविलेले चॉकलेट तर मुलांना फारच प्रिय असते. पण, हे तिन्ही पदार्थ मेंदूला उत्तेजना देणारे आहेत. चहा-कॉफी-चॉकलेट खाऊन उत्तेजित झालेल्या मेंदूमुळे एकाग्रता कमी होऊ शकते. त्यामुळे, शाळेतील मुलांना चॉकलेट अति प्रमाणात देऊ नये. त्याऐवजी सुका मेवा खाण्याची सवय लावावी. चहा-कॉफी ऐवजी शतावरी कल्प, “संतुलन चैतन्य कल्प’ टाकून कपभर दूध घेण्याची सवय असू द्यावी. दूध मेंदूसाठी, ज्ञानेंद्रियांसाठी उत्तम असते हे आयुर्वेदशास्त्राने सांगितले आहेच. आधुनिक संशोधनानुसारही मेंदूची व डोळ्यातील नेत्रपटलाची रचना योग्य होण्यासाठी टोरीन हे द्रव्य आवश्‍यक असते आणि ते दुधातून भरपूर प्रमाणात मिळू शकते, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लहान मुलांनी, शाळेत जाणाऱ्या मुलांनी नियमितपणे दूध अवश्‍य प्यायला हवे.

    आजकाल हॉटेलमध्ये जाण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर मुले थंडगार आईस्क्रीमच वा सॉफ्ट ड्रिंकच मागतात, मग ऋतू कोणताही का असेना. किंवा चटक- मटक काहीतरी खाण्यासाठी डोसा, उत्तप्पा, वडा असे काहीतरी मागतात. एखाद वेळी या सर्व गोष्टी खाणे ठीक आहे. पण, मुलांच्या आरोग्याची काळजी न घेता प्रत्येक वेळी मुले मागतील ते सर्व देता येणार नाही. या वयात शरीराचे सातही धातू तयार होत असतात. त्यामुळे शरीरात वीर्यापर्यंत सर्व धातू व्यवस्थित तयार व्हावेत, ज्यांचा त्यांना पुढच्या सर्व आयुष्याला उपयोग होईल, असा पोषक आहार देणे आवश्‍यक आहे. लहानपणी कफदोष वाढणार नाही असा आहार मुलांना देणे आवश्‍यक असते.

    शाळेत जाण्यापूर्वी मुलांना निदान पंचामृत, भिजवून सोलून बारीक केलेले तीन-चार बदाम, “संतुलन मॅरोसॅन’सारखे एखादे आयुर्वेदिक रसायन, तूप घालून खजूर दिला तर मुलांना काहीतरी पौष्टिक दिल्यासारखे होईल. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शाळेत मुलांना न्यहारी किंवा जेवण व्यवस्थित मिळणार नसले तर मुलांना केशर, बदाम, “संतुलन चैतन्य कल्प’, शतावरी कल्प वगैरे टाकून दोन वेळा दूध घेण्याची सवय लावावी. याने जेवणाचा होणारा दुराचार काही अंशी भरून निघेल. मुलांना शाळेतून आल्यावर मुगाचा लाडू, खोबऱ्याची वडी वगैरे दिल्यास रात्रीचे जेवण हलके ठेवता येईल.

    मुलांना रात्रीचे जेवण लवकरच द्यावे म्हणजे लवकर झोपून मुले सकाळी लवकर उठू शकतील. त्यामुळे मुले वर्गात शिक्षकांनी शिकवलेला अभ्यासक्रम हिरिरीने शिकू शकतील.

    डब्यामध्ये रोज रोज भाजी-पोळी न्यायला मुलांना आवडत नाही म्हणून मुलांना आवडेल व त्यांच्यासाठी पोषकही असेल असा डबा असायला हवा. बऱ्याच शाळांमध्ये पूर्ण दिवसामध्ये दोन सुट्ट्या असतात, एक छोटी तर दुसरी मोठी, दोन्ही सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिल्या तर मुलांनाही तेच तेच खाण्याचा कंटाळाही येत नाही. छोट्या डब्यामध्ये करंजी, खोबऱ्याची वडी, मुगाचा लाडू, मोदक, शिरा, साळीच्या लाह्यांचा चिवडा. फोडणीची पोळी अशा गोष्टी देता येतील.

    वाढत्या वयाला पोषक ठरतील व डब्यातही नेता येतील अशा काही पाककृती येथे दिलेल्या आहेत. यापुढील अंकांतून अशा आणखी काही पाककृती आम्ही देऊ.

    ————————————————————
    मिश्र भाज्यांचा ठेपला
    किसलेला दुधी/गाजर//पालक – २०० ग्रॅम, गव्हाचे पीठ – २५० ग्रॅम, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा तिखट – चवीनुसार, किसलेले आले – तीन ग्रॅम, दही- दोन ते तीन चमचे, तूप किंवा तेल – आवश्‍यकतेनुसार

    वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत त्यात हळद, हिंग, मीठ, साखर व कोथिंबीर टाकून, आवश्‍यकतेनुसार पाणी घालून, तेलाचा हात लावून मळून घ्यावे. थोड्याशा पिठावर ठेपले लाटून तूप टाकून सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.

    हे ठेपले गरम गरम स्वादिष्ट लागतातच पण गार झाल्यावरही चांगले लागतात. हे ठेपले मुलांना घरच्या ताज्या लोण्याबरोबर किंवा दह्याबरोबर खायला देता येतात.

    ————————————————————
    मिश्र धान्यांचा लाडू
    तांदूळ – २०० ग्रॅम, मुगाची डाळ – २०० ग्रॅम, गहू – २०० ग्रॅम, पिठी साखर – ७५० ग्रॅम, तूप – ५०० ग्रॅम, वेलची चूर्ण – सहा ग्रॅम, सर्व धान्ये स्वच्छ करून, धुवून, वाळवून घ्यावीत.

    लोखंडाच्या कढईत सर्व धान्ये सोनेरी रंगावर भाजून घ्यावीत व गार झाल्यावर दळून (कणकेपेक्षा थोडे जाड) घ्यावी. सर्व पिठे एकत्र करावी.

    जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून, त्यात पीठ घालावे व मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजावे.

    मिश्रण गार झाल्यावर त्यात पिठी साखर व वेलची चूर्ण मिसळून लाडू बांधावेत.

  • थंडी आणि व्यायाम

    थंडी आणि व्यायाम

    व्यायामाची ऊब व्यक्‍तीला घडवते. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी व नंतर येणारा जीवनाचा भार सहन करण्यासाठी शरीराला स्थैर्य लागते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पळून जाता येत नाही. त्या अडचणींना सामोरे जावेच लागते. अडचणींना सामोरे जाण्याचे स्थैर्य व धैर्य व्यायामाने मिळते. व्यायामाने रक्‍ताभिसरण वाढते. हात, मांड्या, छाती, पाय यांचे स्नायू घट्ट होऊन त्यांना सुंदर आकार येतो. एकदा सकाळी व्यायाम झाला, की साधारणतः दिवसभर थंडीचा लवलेश जाणवत नाही. तेव्हा व्यायामामुळे स्वतःला तर ऊब मिळतेच, परंतु आवश्‍यक असणाऱ्यांना संरक्षणाची व मायेची ऊबही देता येते.

    “तरुणपणी तरी प्रत्येकाने व्यायाम करावा’ असे बऱ्याच वर्षांपासून अनेक जण सांगत आहेत. पण “इच्छा असूनही तसे जमलेच नाही’ असे सांगणारेही अनेक जण आहेत. उशिरा उठण्याची सवय असणाऱ्यांना व्यायाम जमणार तरी कसा? कारण उशिरा उठल्याने त्यांना शाळेला, कॉलेजला, कामावर जायची घाई होते. “अनेकांनी सांगून पाहिले, परंतु व्यायामाला काही मुहूर्त लागत नव्हता. पण आता नक्की ठरवले, की या थंडीत व्यायाम नक्की करायचा,’ असा निश्‍चय अनेक जण दर वर्षी करताना दिसतात.

    थंडीचा व व्यायामाचा संबंध काय? एक संबंध म्हणजे व्यायाम करणाऱ्याने भरपूर व पौष्टिक खावे, छान मलईसहित दूध प्यावे असा रिवाज असल्याने थंडीच्या दिवसांत छान पौष्टिक आहार करता येईल, अशा समजाने थंडीत व्यायामाला सुरवात करण्याचे ठरविले जाते. दुसरा व्यायामाचा व थंडीचा संबंध असा, की थंडीत खाऊन-पिऊन जाड पांघरूण वा रजई घेऊन झोपले तर ऊब मिळते, वजनही वाढते, पण घाम येत नाही. व्यायामाचा उपयोग ऊब मिळण्यासाठी, शरीर गरम होण्यासाठी तर होतोच, पण व्यायामाने छानपैकी घाम निघून गेला, की नंतर शरीराला ताजेतवाने वाटण्यासाठीही होतो.

    प्रत्येकाला ऊब हवी असते, हे आपण जाणतोच. त्यातली व्यायामाची ऊब व्यक्‍तीला घडवते. शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी व नंतर येणारा जीवनाचा भार सहन करण्यासाठी शरीराला स्थैर्य लागते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी पळून जाता येत नाही. त्या अडचणींना सामोरे जावेच लागते. अडचणींना सामोरे जाण्याचे स्थैर्य व धैर्य व्यायामाने मिळते. खूप पैसे मिळतात म्हणून चित्रपटात काम करणारे नट व्यायामशाळेत म्हणजे जिममध्ये जाऊन शरीराचे पट दाखवता येतील इथपर्यंत घटवितात. मग काही तरुण मुले मात्र भाव मारण्यासाठी त्यांचेच नुसते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.

    मुळात शरीराला एक घाट पाहिजे, खाण्या-पिण्याच्या सवयी चांगल्या पाहिजेत आणि व्यायामाची सवय पाहिजे. 50 वर्षांपूर्वी, भाव मारण्यासाठी म्हणून नव्हे, तर प्रकृती सुदृढ राहावी, आरोग्यवान राहता यावे व जीवनाला सहजतेने सामोरे जाता यावे म्हणून सर्वच मुले व्यायाम करत असत. दंड-बैठका, सूर्यनमस्कार हे अत्यंत आवडते व प्रचलित व्यायामप्रकार बहुतेक सर्व घरी होत असत. काही जण आखाड्यात जाऊन वजन उचलणे, डंबेल्स फिरवणे, मल्लखांब खेळणे किंवा कुस्ती लढणे असे व्यायाम करत असत. अर्थात कुस्तीसाठी दंड-बैठकांची आवश्‍यकता असतेच.

    काय घडले ते कळायला मार्ग नाही, परंतु व्यायामाची आवड मध्यंतरीच्या काळात कमी झाली. कस नसलेले अन्नधान्य हे यासाठी कारण असावे कदाचित. “व्यायाम करा, शरीर कमवा’ असे कोणी सांगितले तर “आम्ही शांतताप्रिय आहोत, आम्हाला कुठे लढायला जायचे आहे?’ अशा तऱ्हेचे विचार ऐकू येऊ लागले. परंतु लढाईला जायचे नसले तरी स्वसंरक्षण किंवा अबलांचे-दुर्बलांचे संरक्षण करावेच लागते. तसेच देशाच्या सीमा जागृत ठेवण्यासाठी सुदृढ सैनिकांची आवश्‍यकता असते.

    पूर्वीच्या काळी गावात हनुमानाचे मंदिर असे व मंदिरापुढे कुस्तीसाठी हौदा व इतर व्यायाम करण्यासाठी जागा असे. अत्यंत अल्प खर्चाच्या अशा व्यायामशाळा गावोगावी असत. एखाद्या शहरात सुदृढ शरीराला महत्त्व देणारे, सामाजिक जाण असलेले किंवा धनिक व्यक्‍तिमत्त्व असले तर त्या ठिकाणी व्यायामाची इतर साधने, पोहण्यासाठी तलाव अशा इतर सुविधा असत. बडोद्यासारख्या ठिकाणी श्री. माणिकरावजी यांचा आखाडा प्रसिद्ध व सर्वांच्या परिचयाचा होता.

    सकाळी उघड्या हवेत मैदानावर व्यायाम करणे, मैदानावर पळणे, तेथे थोडी परेड करणे आणि हुतूतू, खोखो असे व्यायामाला पूरक खेळ खेळले जात असत. पण अलीकडे जिम (व्यायामासाठी यंत्रशाळा) ठिकठिकाणी सुरू होईपर्यंत व्यायामाचे महत्त्व जणू कोणाला समजतच नाही. अर्थात शर्टाची वरची दोन बटणे उघडी ठेवण्याची फॅशन आल्याचा एक फायदा झाला, की उघड्या शर्टातून दिसणारी छाती भरदार आहे हे लोकांना दिसावे, या हेतूने तरुण मुले पुन्हा व्यायाम करू लागली.

    व्यायामाने रक्‍ताभिसरण वाढते. हात, मांड्या, छाती, पाय यांचे स्नायू घट्ट होऊन त्यांना सुंदर आकार येतो. एकदा सकाळी व्यायाम झाला, की साधारणतः दिवसभर थंडीचा लवलेश जाणवत नाही. तेव्हा व्यायामामुळे स्वतःला तर ऊब मिळतेच, परंतु आवश्‍यक असणाऱ्यांना संरक्षणाची व मायेची ऊबही देता येते.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • चक्रोपासना

    चक्रोपासना

    आयुर्वेदातील त्रिदोष आणि योगशास्त्रातील षट्‌चक्रे यांच्यातील दुवा पंचमहाभूतांच्या साह्याने साधता येतो. सहाही चक्रांपैकी शेवटचे सहस्रदल चक्र सोडले, तर इतर पाचही चक्रांचा कोणत्या ना कोणत्या महाभूताशी संबंध सांगितलेला आहे. आयुर्वेदातही कोणत्या महाभूतांच्या संयोगाने कोणते दोष तयार होतात, हे समजावलेले आहे. षट्‌चक्रांचे स्थान, त्यांचे गुण, त्यांचे रंग यावरूनही षट्‌चक्रांचा आरोग्याशी असलेला संबंध लक्षात घेता येतो. 

    प्रसन्न आत्मेन्द्रियमनः स्वस्थमित्यभिधीयते ।
    म्हणजे “मन, इंद्रिये आणि आत्मा यांचे प्रसन्नत्व हे खरे आरोग्य’ अशी आरोग्याची व्याख्या आयुर्वेदाने केली. फक्‍त रोगनिवारण नव्हे, तर आरोग्यरक्षण हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असेही सांगितले, यावरून आयुर्वेदशास्त्र अमर्याद आहे हे लक्षात येऊ शकते.औषध घेण्याने, मसाज, स्वेदनादी उपचार घेण्याने किंवा शस्त्रकर्म करण्याने संपूर्ण आरोग्य मिळेलच असे नाही. आयुर्वेदाला अभिप्रेत असणारे सर्वांगीण आरोग्य मिळविण्याचे प्रयत्न करायचे असतील, तर शारीरिक व मानसिक पातळीच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल. यासाठी चक्रोपासना उपयोगी पडू शकते. आयुर्वेदशास्त्राचा सख्खा जोडीदार म्हणजे योगशास्त्र. षट्‌चक्र, चक्रोपासना हे विषय योगशास्त्राचे असले तरी यांचा आधार घेण्याने आयुर्वेदाचाही मूळ उद्देश साध्य होण्यास मदत होऊ शकते.आयुर्वेदातील त्रिदोष आणि योगशास्त्रातील षट्‌चक्रे यांच्यातील दुवा पंचमहाभूतांच्या साह्याने साधता येतो. सहाही चक्रांपैकी शेवटचे सहस्रदल चक्र सोडले, तर इतर पाचही चक्रांचा कोणत्या ना कोणत्या महाभूताशी संबंध सांगितलेला आहे. आयुर्वेदातही कोणत्या महाभूतांच्या संयोगाने कोणते दोष तयार होतात, हे समजावलेले आहे. षट्‌चक्रांचे स्थान, त्यांचे गुण, त्यांचे रंग यावरूनही षट्‌चक्रांचा आरोग्याशी असलेला संबंध लक्षात घेता येतो.

    मूलाधार व स्वाधिष्ठान चक्र मूलाधार चक्र हे पहिले चक्र. या ठिकाणी पृथ्वीतत्त्वाचे आधिक्‍य असते. याचा गुण “गंध’ आहे, तर रंग सोनेरी पिवळा असतो व ते मेरुदंडाच्या तळाशी स्थित असते. स्वाधिष्ठान चक्र हे त्यावरचे चक्र. या ठिकाणी जलतत्त्व असते. याचा गुण “चव’ असतो, तर रंग पांढरा / चंदेरी असतो व ते ओटीपोटात असते.
    पृथ्वी व जल महाभूताची जोडी जमणे स्वाभाविक असते. आयुर्वेदात या दोन तत्त्वांच्या संयोगातून कफदोष तयार होतो, असे सांगितले आहे. तसेच योगशास्त्रानुसारही ही दोन चक्रे एकमेकांशी संबंधित असल्याचे समजू शकते. या दोन्ही चक्रांचा एकत्रितपणे आरोग्यावर काय परिणाम होत असतो, हे आपण पाहणार आहोत.मूलाधार आणि स्वाधिष्ठान या चक्रांचा प्रभाव गुद, मलाशय, मोठे आतडे, मूत्राशय, वृक्क, गर्भाशय, योनी, बीजाशय, प्रोस्टेट, वृषण, लिंग, पाय, कंबर वगैरे अवयवांवर असतो. या चक्रांतील दोषामुळे बद्धकोष्ठ, मूत्रविकार, लैंगिक विकार, शुक्रदोष, वंध्यत्व, कंबरदुखी, स्त्रियांच्या बाबतीत पाळीतील दोष, गर्भाशयाचे विकार वगैरे विकार होऊ शकतात. मूळव्याध, भगंदर, परिकर्तिका (फिशर) यासारख्या रोगांचे, तसेच मूतखडा, वृक्कहानी, प्रमेह यासारख्या विकारांचे मूळ या दोन चक्रांमधील बिघाडात असू शकते.

    वातविकारांचे मूळ
    आयुर्वेदाप्रमाणे शरीराचा खालचा एक तृतीयांश भाग वातदोषाच्या आधिपत्याखाली येतो. वातदोषाचे मुख्य स्थान मोठे आतडे व पक्वाशय असते. त्यामुळे विविध वातविकारांचे मूळही या दोन चक्रांमध्ये असू शकते. संधिवात, कंबरदुखी, अर्धांगवात, अंग सुन्न होणे, गृध्रसी (सायटिका), अंग सुकणे, अर्दित (चेहरा वाकडा होणे), अंग जखडणे, अमुक ठिकाणी स्फुरण होत राहणे, पायावरच्या वगैरे शिरा जाड होणे, निद्रानाश, शुक्रनाश, अस्वस्थता, अंग कडक होणे, स्पर्शज्ञान न होणे, चव न समजणे, वास न येणे, नजर कमकुवत होणे, यासारखे अनेक त्रास वातविकारात समाविष्ट होतात.
    मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्राचा अनेक शरीरव्यापार व्यवस्थित होण्यामध्येही महत्त्वाचा हातभार असतो. त्यातील काही महत्त्वाचे शरीरव्यापार पुढीलप्रमाणे सांगता येतील –

    * मलप्रवर्तन क्रिया वेळच्या वेळी होणे व पोट साफ होणे.
    * मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित होणे.
    * स्त्रियांच्या बाबतीत पाळी वेळच्या वेळी येणे आणि रक्‍तस्राव वेदनारहित, गाठीरहित वगैरे असणे.
    * गर्भधारणा होणे, गर्भाची वाढ व्यवस्थित होणे आणि योग्य वेळेला नैसर्गिक प्रसव होणे.
    * गंधाचे व चवीचे ज्ञान होणे.
    * स्पर्शज्ञान व्यवस्थित असणे.
    * मन उत्साहित राहणे.

    मनावर प्रभाव
    चक्रांचा शरीरावयवांवर, शरीरव्यापारांवर जेवढा प्रभाव असतो, त्यापेक्षा त्यांचा काकणभर अधिक परिणाम मनावर असतो.
    पृथ्वी महाभूत स्थिरता, सौष्ठवता, मजबुती, अचलता वगैरे गुणांनी परिपूर्ण असते, तर जल महाभूत उचित ओलावा, स्निग्धता, मार्दवता, प्रसन्नता वगैरे भावांचे कारण असते. दोन गोष्टींना जोडण्याचे कामही जल महाभूताच्या ओलाव्याशिवाय होऊ शकत नाही.

    एखादा मूर्तिकार ज्याप्रमाणे मातीत योग्य प्रमाणात पाणी मिसळून, तिला नीट मळून सुबक मूर्ती तयार करतो, त्याचप्रमाणे पृथ्वी व जल महाभूताच्या संयोगाने म्हणजेच संतुलित मूलाधार, स्वाधिष्ठान चक्रांमुळे प्रभावी, कणखर व्यक्तिमत्त्वाचा लाभ होऊ शकतो. मनाची स्थिरता, सतत कार्यमग्न राहण्याची प्रेरणा, विषयाचे अचूक आकलन, निश्‍चित निर्णय घेण्याची क्षमता, हे सर्व मानसिक भावही पाठोपाठ येतात. याउलट या दोन चक्रांत दोष असला, तर गैरसमज, गोंधळ, आळस, अस्थिरता वगैरे मानसिक त्रास होऊ शकतात. चरकसंहितेत एक सूत्र आहे –

    सर्वां हि चेष्टा वातेन स प्राणः प्राणिनां स्मृतः । तेनैव रोगा जायन्ते तेन चैवोपरुध्यते ।। …चरक सूत्रस्थान
    संतुलित वात शरीरातील सर्व कामे करतो, म्हणूनच “प्राण’ म्हणवला जातो. परंतु हाच “प्राण’रूपी वात बिघडला तर त्यातून अनेक रोग होऊ शकतात. एवढेच नाही, तर मृत्यूही येऊ शकतो.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • शांत झोप

    शांत झोप

    झोप ही परमेश्‍वराची देणगी असल्यामुळे झोपेसाठी कुठल्याही बाह्य साधनांची आवश्‍यकता नसते. खरे तर झोप प्रत्येकाच्या स्वाधीन असावी व नैसर्गिक झोप मिळण्याचे भाग्य प्रत्येकास लाभावे. त्यासाठी “लवकर निजे, लवकर उठे’ हा नियम पाळणे आवश्‍यक आहे

    निसर्गचक्राला धरून केलेली प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते. वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे निसर्गचक्राला धरून तर आहेच, शिवाय अतिशय सोपे व सर्वस्वी आपल्या हातात आहे. “लवकर निजे, लवकर उठे’ असे म्हणताना त्यात पुरेशी झोप घ्यावी, हेही सांगितलेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने दुपारची झोप किंवा जागरण टाळायला हवे.

    आरोग्यरक्षणासाठी शंभर टक्के आपल्या हातात असलेली आणि अगदी सहजपणे कोणालाही करता येईल अशी एकमेव गोष्ट म्हणजे लवकर झोपणे व लवकर उठणे. झोपणे व उठणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाटल्या, तरी त्या परस्परसंबंधित असतात. लवकर उठले की लवकर झोप येते आणि लवकर झोपले की लवकर उठणेही सोपे जाते.

    ब्राह्ममुहूर्तावर उठा
    दिनचर्येची सुरवात अर्थातच उठण्याने होते. आयुर्वेदात नुसतेच लवकर उठावे एवढे सांगितलेले नाही, तर ब्राह्ममुहूर्तावर उठावे, असे सांगितले आहे.
    रात्रेः उपान्त्यो मुहूर्तो ब्राह्मः ।
    अहोरात्रीचा शेवटचा मुहूर्त म्हणजे ब्राह्ममुहूर्त. आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र वगैरे प्राचीन भारतीय शास्त्रात मुहूर्त हे कालगणनेचे एक मान सांगितले आहे. 24 तासांचे जर 15 भाग केले, तर त्यातला एक भाग म्हणजे एक मुहूर्त. म्हणजेच एक तास 36 मिनिटे. रात्रीचा शेवटचा मुहूर्त असताना, म्हणजे साधारणपणे सूर्योदयापूर्वी दीड तास असताना उठणे म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठणे. आयुर्वेदात सांगितले आहे,ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत्‌ स्वस्थो रक्षार्थमायुषः। तत्र सर्वाघशान्त्यर्थं स्मरेच्च मधुसूदनः।। …अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
    आयुष्याचे रक्षण करण्यासाठी निरोगी मनुष्याने ब्राह्ममुहूर्तावर उठावे व सर्व पाप, सर्व संकटे दूर होण्यासाठी मधुसूदनाचे स्मरण करावे. ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ब्राह्ममुहूर्त हा ज्ञानोपासना करण्यासाठी सर्वोत्तम काळ समजला जातो. विद्यार्थ्याने अभ्यास करण्यासाठी, एखाद्या कलावंताने कलेची उपासना करण्यासाठी, तसेच साधकाने साधना करण्यासाठी ब्राह्ममुहूर्त उत्तम असतो. मन एकाग्र होणे, बुद्धी-स्मृती-मेधा वगैरे प्रज्ञाभेद सर्वाधिक कार्यक्षमतेने काम करणे साध्य होण्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उपासना, साधना करणे चांगले असते, असे समजले जाते.
    सूर्योदयापूर्वी उठल्यास उषःकाली सूर्यकिरणांमध्ये विशिष्ट प्रकारच्या शक्‍ती मनुष्याला मिळू शकतात. पहाटे एकूणच वातावरण शांत असते, आदल्या दिवसाचे गोंधळ घालणारे विचारतरंगही शांत झालेले असतात. म्हणून नवीन संकल्पना, प्रेरणा उत्पन्न होण्यासाठी या शांत वातावरणाचा फायदा होऊ शकतो. सकाळी उठून केलेला अभ्यास नीट स्मरणात राहतो. साहजिकच पहाटे लवकर उठायचे असल्यास माणसाला आवश्‍यक असणारी सहा-सात तासांची झोप पूर्ण होण्यासाठी रात्री लवकर, 10-11 वाजता झोपणे आवश्‍यक आहे. तेव्हा लवकर उठणाऱ्याला लवकर झोपावे लागतेच वा ते आपसूक घडतेच. रात्रीच्या वेळी पित्ताची वेळ असल्याने त्या वेळी शरीरात वाढणारे पित्त व उष्णता कमी करण्यासाठीही लवकर झोपून लवकर उठण्याचा उपयोग होतो. यामुळे माणसाची प्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी उपयोग होतो आणि एकूणच मनःस्वास्थ्य मिळून यश व उत्कर्ष होतो.

    सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपसूक सर्व प्राणिमात्र जागे होतात, शक्‍तीचे उत्थापन होते, कामाला प्रेरणा मिळते व हलके हलके दिवस जसा जसा वर येतो तसतशी स्फूर्ती वाढते आणि सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळी आपणही विसावा घ्यावा, अशी भावना उत्पन्न होते. म्हणून हे चक्र सांभाळण्यासाठी सकाळच्या प्रहरी उठणे आरोग्यासाठी हितकर ठरावे.
    ब्राह्ममुहूर्तावर उठल्यावर अजून एक गोष्ट आपोआप साध्य होते व ती म्हणजे मलविसर्जन व्यवस्थित होते. आयुर्वेदात सांगितले आहे,जातवेगः समुत्सृजेत्‌। …अष्टांगसंग्रह सूत्रस्थानआयुष्याची इच्छा करणाऱ्या व्यक्‍तीने ब्राह्ममुहूर्तावर उठून वेग उपस्थित झाल्यास अडवू नये. मलविसर्जन ही क्रिया वाताच्या आधिपत्याखाली येते. निसर्गचक्रासारखेच शरीरातही वात-पित्त-कफदोषाचे एक चक्र असते. यात अहोरात्र- म्हणजे 24 तासांचे सहा विभाग केलेले असतात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या 12 तासांचे तीन भाग केले तर त्यातला पहिला भाग कफाचा, दुसरा पित्ताचा व तिसरा वाताचा असतो. म्हणजेच दिवसाच्या पहिल्या एक तृतीयांश भागात कफदोषाचे आधिक्‍य असते, मधल्या एक तृतीयांश भागात पित्तदोष विशेषत्वाने कार्यक्षम असतो तर शेवटच्या एक तृतीयांश भागात वातदोष अधिक उत्कट होत असतो. दिवसाचे हे चक्र रात्रीही याच क्रमाने पुन्हा होते.विसर्जन क्रिया वाताच्या आधिपत्याखाली येत असल्याने ती क्रिया सकाळी कफाचा काळ सुरू होण्यापूर्वी, म्हणजे सूर्योदयापूर्वी होणे उत्तम असते. वाताच्या काळात वाताची क्रिया अधिक चांगल्या प्रकारे होत असल्याने सकाळी लवकर उठल्याने पोट साफ व्हायला खूपच चांगला हातभार लागत असतो. नियमितपणे रोजच्या रोज पोट साफ झाले तर त्यामुळे अनेक रोगांना प्रतिबंध होऊ शकतो व आरोग्य नीट राहू शकते हे सर्वज्ञात आहे.पुरेशी झोप घ्या

    “लवकर निजे लवकर उठे’ असे म्हणताना त्यात पुरेशी झोप घ्यावी हेही सांगितलेले आहे. वय, प्रकृती, काम, हवामान वगैरे अनेक गोष्टींवर झोपेचे प्रमाण अवलंबून असते. उदा.- लहान मुलांना मोठ्यांपेक्षा जास्त झोप मिळणे आवश्‍यक असते. वात, तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्‍तींना स्वभावतःच झोप कमी असते, पण वास्तविक त्यांनी पुरेसे व शांतपणे झोपणे आवश्‍यक असते. शारीरिक श्रम, प्रवास करणाऱ्यांना झोप थोडी जास्त लागू शकते. तसेच शरीरशक्‍ती कमी असणाऱ्या ऋतूत झोपेची आवश्‍यकता वाढू शकते. योग्य वेळेला, योग्य प्रमाणात घेतलेली झोप आहाराप्रमाणेच शरीराचे पोषण करत असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

    आहारादिवत्‌ निद्रा देहस्थितिकारिणी तथा सुखदुःखे, पुष्टिकार्श्‍ये, बलाबले, वृषताक्‍लीबता ज्ञानाज्ञानं जीवितमरणं च निद्रायत्ते ।। …चरक सूत्रस्थान आहाराप्रमाणेच झोपसुद्धा देहस्थितीची कारक असते. योग्य झोपेमुळे सुख, पुष्टी, बल, वृषता, ज्ञान, जीवन या सर्व गोष्टी अवलंबून असतात; तर अयोग्य झोपेमुळे दुःख, कृशता, अशक्‍तता, नपुंसकता, अज्ञान, मरणसुद्धा येऊ शकते. बऱ्याच जणांना दुपारी झोपण्याची सवय असते, पण दिवसा झोपणे कफ-पित्त वाढविणारे असते. शिवाय त्यामुळे स्थूलता, आम्लपित्त, मधुमेह वगैरे अनेक विकारांना आमंत्रण मिळू शकते. शिवाय दिवसा झोपण्याने रात्री वेळेवर झोप येत नाही. म्हणजे “लवकर निजे लवकर उठे’ सांभाळणे अवघड होऊन बसते.

    जागरणाचे दुष्परिणाम
    ‘लवकर निजे लवकर उठे’ या उक्‍तीला नाट लागतो तो जागरणामुळे. जागरण झाले की सकाळी उशिरा उठणे ओघाने आलेच. बऱ्याचदा असे दिसते, की “जागरण करू नका’ असे सांगितले की समोरची व्यक्‍ती “पण मी सकाळी उशिरा उठतो, माझी झोप पूर्ण होते,’ असे सांगते. पण झोपेच्या बाबतीत पुरेशा तासांइतकेच महत्त्व योग्य वेळी झोप घेण्यालाही असते, हे लक्षात घ्यावे लागते. रात्रीच्या जागरणांनी अंगात रुक्षता वाढते, वात वाढतो, तसेच पित्तही वाढते. उशिरा उठल्याने अंग जड होते, उत्साह वाटत नाही, शौचाला साफ होत नाही.
    अवेळी झोपण्याने शरीरावर काय दुष्परिणाम होतात, हे आयुर्वेदात सांगितलेले आहे…
    अकालशयनात्‌ मोह-ज्वर स्तैमित्य-पीनस-शिरोरुक्‌-शोफ-हृल्लास-स्रोतोरोध-अग्निमंदता भवन्ति । …अष्टांगहृदय सूत्रस्थान

    अवेळी झोपल्याने, म्हणजेच रात्री उशिरा, जेवणानंतर लगेच, दुपारी दोनप्रहरी झोपणे वगैरे प्रकारे झोपण्याने :

    * विचारांचा गोंधळ होतो.
    * शरीर थिजलेले वाटते.
    * वारंवार सर्दी, डोकेदुखीचा त्रास जाणवतो.
    * अंगावर सूज येते.
    * मळमळ होते.
    * शरीरातील स्रोतसे अवरुद्ध झाल्याने शरीर आंबल्यासारखे वाटते.
    * अग्नी मंद होतो.

    निसर्गचक्राला धरून केलेली प्रत्येक गोष्ट आरोग्यासाठी चांगली असते हे सर्व जाणतातच. वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे निसर्गचक्राला धरून तर आहेच, शिवाय अतिशय सोपे व सर्वस्वी आपल्या हातात आहे. तेव्हा “लवकर निजे लवकर उठे, त्यासी ऋद्धी-सिद्धी भेटे’ या उक्‍तीचा अनुभव घेऊन पाहावा हे उत्तम!

    योग्य व पुरेशा झोपेचे फायदे
    पुरेशी व योग्य झोप मिळते आहे का, हे समजण्यासाठी आयुर्वेदाने योग्य झोपेचे सांगितलेले फायदे बघायला हवेत.
    कालशयनात्‌ पुष्टिवर्णबलोत्साह अग्निदीप्तिअतंद्रा धातुसात्म्यानि भवन्ति।
    …सुश्रुत चिकित्सास्थान
    * शरीर पुष्ट होते. या ठिकाणी पुष्ट शब्दाचा अर्थ जाड होणे, असा अपेक्षित नाही, तर सर्व धातूंनी शरीर संपन्न असणे म्हणजे पुष्ट असणे.
    * पुरेशा व योग्य वेळेला घेतलेल्या झोपेने कांती उजळते, शरीरवर्ण उत्तम राहतो.
    * शरीराची ताकद, स्टॅमिना चांगला राहतो.
    * उत्साह म्हणजे आपणहून काहीतरी छान करण्याची भावना तयार होते, सर्जनता वाढते.
    * अग्नी प्रदीप्त होतो, पचन सुधारते.
    * डोळ्यांवर झापड वगैरे येत नाही.
    * सर्व धातू समस्थितीत राहतात.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • बहुगुणी आवळा

    बहुगुणी आवळा

    आयुर्वेदाने दात व हाडे यांचा खूप जवळचा संबंध सांगितला आहे. हाडे जितकी मजबूत आणि चांगली तितके दात बळकट असतात, तर अस्थिक्षय झाला म्हणजे हाडे झिजायला लागली तर त्याचा परिणाम म्हणून दात खराब होऊ लागतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

    दात चांगले असणे, हे आरोग्य तसेच सौंदर्य या दोन्ही दृष्टींनी खूप महत्त्वाचे असते. मोत्यासारखे दात चेहऱ्याला शोभा देतात, तसेच शरीरशक्‍ती चांगली असल्याचीही ग्वाही देतात.
    स्थः कठिनश्‍चर्वणादिसाधनो।वयवः दन्तः ।

    कठीण अन्न चावण्याचे साधन असणारा अवयव म्हणजे दात. आयुर्वेदाने दात व हाडे यांचा खूप जवळचा संबंध सांगितला आहे. हाडे जितकी मजबूत आणि चांगली तितके दात बळकट असतात, तर अस्थिक्षय झाला म्हणजे हाडे झिजायला लागली तर त्याचा परिणाम म्हणून दात खराब होऊ लागतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
    दात जन्मतः नसतात, किंबहुना जन्मतः दात असणे अप्रशस्त समजले जाते. सर्वसाधारणपणे सहाव्या ते आठव्या महिन्यात दात यायला सुरवात होते. आठव्या महिन्यात दात येणे उत्तम समजले जाते. फार लवकर म्हणजे चौथ्या-पाचव्या महिन्यात आलेले दात अशक्‍त असतात, लवकर झिजतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. आदर्श दात कसे असतात, हेही आयुर्वेदात सांगितलेले आहे.

    दुधाचे दात येणे, ते पडणे, नवे पक्के दात येणे, ते स्थिर राहणे किंवा क्षीण होणे, बळकट राहणे वा हलू लागणे, अशक्‍त होणे, रोगाविष्ट होणे… या सर्व गोष्टी पुढील मुद्‌द्‌यांवर अवलंबून असतात.

    * स्त्रीबीज व पुरुषबीजाची संपन्नता – सर्व शरीरावयवांची मूळ जडणघडण ही गर्भधारणा होत असतानाच होत असते. दोन्ही बीजांमधील दातांसाठी जबाबदार असणारा भाग जितका चांगला असेल तितके दातांचे आरोग्य चांगले राहते.

    * पित्याचे आरोग्य – दात आनुवंशिकतेवरही अवलंबून असतात. एखाद्या घरात सगळ्यांचेच दात उपजत चांगले असू शकतात, तर एखाद्या घरात सगळ्यांचेच दात निकृष्ट असू शकतात.

    * स्वकर्म – स्वतः घेतलेल्या दातांच्या काळजीवरही दातांचे आरोग्य अवंलबून असते. विशेषतः लहान वयात व तरुण वयात दातांची व्यवस्थित निगा राखली, हाडांना-दातांना आवश्‍यक ते पोषण मिळण्याकडे लक्ष दिले तर दातांची बळकटी कायम राहू शकते.

    बीजसंपन्नता, आनुवंशिकता व स्वतःने घ्यावयाची काळजी… या तीन गोष्टी वेगवेगळ्या सांगण्यामागे काही कारण आहे. आनुवंशिकता महत्त्वाची असली तरी गर्भधारणा होण्यापूर्वी स्वतःच्या तब्येतीकडे नीट लक्ष द्यायला हवे आणि या दोहोंमुळे जन्मतः दात उत्तम असले तरी नंतर त्यांची स्वतः काळजी घेणेही खूप महत्त्वाचे असते. निरोगी दातांसाठी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अनेक साध्या सोप्या गोष्टी करता येतील.

    * सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हाडांना पोषक आहार व रसायनांचे सेवन करून दातांना आतून ताकद देणे. त्यादृष्टीने आहारात दूध, खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, नाचणी सत्त्व, गहू, तूप यांचा समावेश करता येतो. प्रवाळ, मोती, अश्‍वगंधा वगैरे अस्थिपोषक द्रव्यांपासून बनविलेली रसायने सेवन करता येतात.

    * दातांची स्वच्छता ठेवणे, काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणे, सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी कडू, तुरट, तिखट चवीच्या व हिरड्या-दातांना घट्ट करणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेल्या चूर्णाने दात घासणे किंवा दात-हिरड्यांवर असे चूर्ण थोडा वेळ लावून ठेवणे.

    * चूळ भरता येईल एवढ्या (साधारण 5-6 चमचे) कोमट पाण्यात अर्धा ते एक चमचा इरिमेदादी तेलासारखे तेल टाकावे व हे पाणी 7-8 मिनिटे तोंडात धरून ठेवावे व नंतर थुंकून टाकावे. खळखळून चुळा भरून टाकाव्यात.

    वास्तविक आई-वडिलांकडून उत्तम दाताचा वारसा लाभला असला व या सर्व गोष्टी सुरवातीपासून नीट केल्या असल्या तर दाताच्या तक्रारी उद्भवू नयेत. पण तरीही आयुर्वेदात दात व हिरड्यांसंबंधी अनेक रोग सांगितले आहेत.

    शीतोदालन
    वातादुष्णासहादन्ताः शीतस्पर्शाधिकव्यथा ।
    इव शूलेन शीताख्योदाल्यन्तश्‍चसः ।।…अष्टांगसंग्रह
    वातदोषामुळे दात गरम वस्तूचा स्पर्श सहन करू शकत नाहीत, तसेच दातांना थंड स्पर्शही सहन होत नाही. थंड स्पर्शाने दातात तीव्र कळा येतात, त्याला “शीतोदालन’ असे म्हणतात.

    दन्तहर्ष
    दन्तहर्षप्रवाताम्लः शीतभक्षाक्षमाद्विजाः ।
    भवन्त्यम्लशनैनेव सरुजश्‍चलिता इव ।।…अष्टांगसंग्रह
    थंड हवा, आंबट चव व थंड खाद्य-पेय सहन न होणे. विशेषतः आंबट चवीमुळे दातात वेदना होणे व दात हलू लागणे, याला “दन्तहर्ष’ असे म्हणतात.

    दन्तभेद
    दन्तभेदेद्विजास्तोदभेदरुक्‌स्फुटनान्विताः ।…अष्टांगसंग्रह
    दातांमध्ये टोचल्याप्रमाणे, तोडल्याप्रमाणे तीव्र वेदना होत असल्यास त्यास “दंतभेद’ असे म्हणतात.

    दन्तचाल
    चालश्‍चलद्भिर्दर्शनैः भक्षणात्‌ अधिकव्यथैः ।…अष्टांगसंग्रह
    दात हलणे, काहीही खाल्ले असता दातात अधिक वेदना होणे याला “दंतचाल’ असे म्हणतात.

    दन्तशर्करा
    अधावनान्मलो दन्ते कफो वा वातशोषितः । पूतिगन्धिः स्थिरीभूतः शर्करा ।।
    दात नीट स्वच्छ न करण्याने किंवा वातामुळे कफदोष शुष्क झाल्याने दातावर किट्ट जमा होण्याला “दन्तशर्करा’ म्हणतात. यामध्ये मुखाला दुर्गंधी येते.

    कपालिका – दन्तशर्कराची पुढची अवस्था म्हणजे कपालिका.
    शातयत्युणुशोदन्तकपालानि कपालिका ।।
    …अष्टांगसंग्रह
    दन्तशर्करेकडे दुर्लक्ष झाल्यास त्यामुळे दाताची कणाकणाने झीज होते, त्याला “कपालिका’ असे म्हणतात.

    दन्तश्‍याव
    श्‍यावः श्‍यावत्वमायातो रक्‍तपित्तानिलर्द्विजः ।
    रक्‍त, पित्त व वायूमुळे दात काळे पडण्यास “दन्तश्‍याव’ म्हणतात.

    कृमिदन्तक
    समूलं दन्तमाश्रित्य दोषैरुल्बणमारुतैः ।
    शोषितेमज्ञिसुषिरे दन्ते।न्नमलपूरिते ।।
    पूतित्वात्‌ क्रिमयः सूक्ष्मा जायन्ते जायते ततः ।।
    मुख्य वातदोष व बरोबरीने पित्तदोष व कफदोष हे जेव्हा मुळासकट दाताचा आश्रय घेतात तेव्हा दातातील मज्जा धातू सुकतो. मज्जा धातू सुकल्याने दात ठिसूळ होतो, पोकळ होतो. या पोकळीत अन्न अडकून राहिले की ते तेथे सडते आणि मग त्या ठिकाणी सूक्ष्म कृमी तयार होतात.
    कृमिदन्तामुळे दातात तीव्र वेदना उत्पन्न होतात, कधी कधी या वेदना आपणहून शांतही होतात. यालाच सामान्य भाषेत दात किडणे असे म्हटले जाते.

    शीताद
    श्‍लेष्मरक्‍तेन पूतीनि वहन्त्यस्रमहेतुकम्‌ ।
    शीर्यन्ते दन्तमांसानि मृदुल्लिन्नासितानि च ।।
    कफ व रक्‍तदोष यांच्यातील बिघाडामुळे हिरड्या कोमल, संवेदनशील व काळ्या रंगाच्या होतात. याला “शीताद’ असे म्हणतात. यात हिरड्यांमधून रक्‍त व पू येतो.

    उपकुश
    उपकुशः पाकः पित्तासृक्‌ उद्भवः ।
    पित्त व रक्‍तामुळे हिरड्या पिकतात, त्याला “उपकुश’ असे म्हणतात. यामध्ये हिरड्यांची आग होते, हिरड्या लाल होऊन सुजतात, खाजतात, हिरड्यांमधून रक्‍त येते, दात हलू लागतात, तसेच मुखाला दुर्गंधी येते.

    सुषिर
    श्‍वयथुर्दन्तमूलेषु रुजावान्‌ रक्‍तपित्तजः ।
    लालास्रावी च सुषिरो दन्तमांसप्रशातनः ।।
    दातांच्या मुळाशी रक्‍त व पित्तातील दोषामुळे सूज येते, वेदना होतात, लाळ अधिक प्रमाणात सुटते व हळूहळू हिरड्या नष्ट होऊ लागतात, याला “सुषिर’ असे म्हणतात.

    दन्तनाडी
    दन्तमांसाश्रितान्‌ रोगान्‌ यः साध्यानप्युपेक्षते ।
    अन्तस्तस्यास्रवन्‌ दोषः सूक्ष्मांसञ्जनयेत्‌ गतिम्‌ ।।
    पूयं मुहुः सास्रवति त्वङ्‌मांसास्थिप्रभेदिनी ।
    जो मनुष्य दात व हिरड्यांच्या साध्या रोगांकडे दुर्लक्ष करतो, त्याचे दोष दातात आतपर्यंत जिरून सूक्ष्म नाडी उत्पन्न करतात. या नाडीतून वारंवार पू वाहतो. यामुळे हिरड्या व दातांची हळू हळू झीज होते.

    आदर्श दात व हिरड्या
    पूर्णता समता घनता शुक्‍लता स्निग्धता श्‍लक्ष्णता निर्मलता निरामयता किंचित उत्तरोन्नता दन्तबन्धनानां च समता रक्‍तता स्निग्धता बृहत्घनास्थिरमूलता चेति दन्तसंपदुच्यते ।।…काश्‍यप सूत्रस्थान
    *सर्व दात सारख्या उंचीचे असावेत.
    *पूर्ण वाढ झालेले, घट्ट व भरीव असावेत.
    *रंगाने शुभ्र असावेत.
    *स्पर्शाला स्निग्ध व गुळगुळीत असावेत.
    *दिसण्यास निर्मल व स्वच्छ असावेत.
    *निरोगी असावेत.
    *वरचे दात खालच्या दातांपेक्षा किंचित पुढे असावेत.
    *हिरड्या समतल, लाल, स्निग्ध, जाड, घट्ट व ज्यांच्यात दात घट्ट बसू शकतील अशा असाव्यात.
    आदर्श दात व हिरड्यांचे वर्णन केलेले असले तरी प्रत्येकाचे दात निरनिराळे असतात.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • दात

    दात

    आयुर्वेदाने दात व हाडे यांचा खूप जवळचा संबंध सांगितला आहे. हाडे जितकी मजबूत आणि चांगली तितके दात बळकट असतात, तर अस्थिक्षय झाला म्हणजे हाडे झिजायला लागली तर त्याचा परिणाम म्हणून दात खराब होऊ लागतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.

    दात चांगले असणे, हे आरोग्य तसेच सौंदर्य या दोन्ही दृष्टींनी खूप महत्त्वाचे असते. मोत्यासारखे दात चेहऱ्याला शोभा देतात, तसेच शरीरशक्‍ती चांगली असल्याचीही ग्वाही देतात.
    स्थः कठिनश्‍चर्वणादिसाधनो।वयवः दन्तः ।

    कठीण अन्न चावण्याचे साधन असणारा अवयव म्हणजे दात. आयुर्वेदाने दात व हाडे यांचा खूप जवळचा संबंध सांगितला आहे. हाडे जितकी मजबूत आणि चांगली तितके दात बळकट असतात, तर अस्थिक्षय झाला म्हणजे हाडे झिजायला लागली तर त्याचा परिणाम म्हणून दात खराब होऊ लागतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
    दात जन्मतः नसतात, किंबहुना जन्मतः दात असणे अप्रशस्त समजले जाते. सर्वसाधारणपणे सहाव्या ते आठव्या महिन्यात दात यायला सुरवात होते. आठव्या महिन्यात दात येणे उत्तम समजले जाते. फार लवकर म्हणजे चौथ्या-पाचव्या महिन्यात आलेले दात अशक्‍त असतात, लवकर झिजतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. आदर्श दात कसे असतात, हेही आयुर्वेदात सांगितलेले आहे.

    दुधाचे दात येणे, ते पडणे, नवे पक्के दात येणे, ते स्थिर राहणे किंवा क्षीण होणे, बळकट राहणे वा हलू लागणे, अशक्‍त होणे, रोगाविष्ट होणे… या सर्व गोष्टी पुढील मुद्‌द्‌यांवर अवलंबून असतात.

    * स्त्रीबीज व पुरुषबीजाची संपन्नता – सर्व शरीरावयवांची मूळ जडणघडण ही गर्भधारणा होत असतानाच होत असते. दोन्ही बीजांमधील दातांसाठी जबाबदार असणारा भाग जितका चांगला असेल तितके दातांचे आरोग्य चांगले राहते.

    * पित्याचे आरोग्य – दात आनुवंशिकतेवरही अवलंबून असतात. एखाद्या घरात सगळ्यांचेच दात उपजत चांगले असू शकतात, तर एखाद्या घरात सगळ्यांचेच दात निकृष्ट असू शकतात.

    * स्वकर्म – स्वतः घेतलेल्या दातांच्या काळजीवरही दातांचे आरोग्य अवंलबून असते. विशेषतः लहान वयात व तरुण वयात दातांची व्यवस्थित निगा राखली, हाडांना-दातांना आवश्‍यक ते पोषण मिळण्याकडे लक्ष दिले तर दातांची बळकटी कायम राहू शकते.

    बीजसंपन्नता, आनुवंशिकता व स्वतःने घ्यावयाची काळजी… या तीन गोष्टी वेगवेगळ्या सांगण्यामागे काही कारण आहे. आनुवंशिकता महत्त्वाची असली तरी गर्भधारणा होण्यापूर्वी स्वतःच्या तब्येतीकडे नीट लक्ष द्यायला हवे आणि या दोहोंमुळे जन्मतः दात उत्तम असले तरी नंतर त्यांची स्वतः काळजी घेणेही खूप महत्त्वाचे असते. निरोगी दातांसाठी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अनेक साध्या सोप्या गोष्टी करता येतील.

    * सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हाडांना पोषक आहार व रसायनांचे सेवन करून दातांना आतून ताकद देणे. त्यादृष्टीने आहारात दूध, खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, नाचणी सत्त्व, गहू, तूप यांचा समावेश करता येतो. प्रवाळ, मोती, अश्‍वगंधा वगैरे अस्थिपोषक द्रव्यांपासून बनविलेली रसायने सेवन करता येतात.

    * दातांची स्वच्छता ठेवणे, काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणे, सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी कडू, तुरट, तिखट चवीच्या व हिरड्या-दातांना घट्ट करणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेल्या चूर्णाने दात घासणे किंवा दात-हिरड्यांवर असे चूर्ण थोडा वेळ लावून ठेवणे.

    * चूळ भरता येईल एवढ्या (साधारण 5-6 चमचे) कोमट पाण्यात अर्धा ते एक चमचा इरिमेदादी तेलासारखे तेल टाकावे व हे पाणी 7-8 मिनिटे तोंडात धरून ठेवावे व नंतर थुंकून टाकावे. खळखळून चुळा भरून टाकाव्यात.

    वास्तविक आई-वडिलांकडून उत्तम दाताचा वारसा लाभला असला व या सर्व गोष्टी सुरवातीपासून नीट केल्या असल्या तर दाताच्या तक्रारी उद्भवू नयेत. पण तरीही आयुर्वेदात दात व हिरड्यांसंबंधी अनेक रोग सांगितले आहेत.

    शीतोदालन
    वातादुष्णासहादन्ताः शीतस्पर्शाधिकव्यथा ।
    इव शूलेन शीताख्योदाल्यन्तश्‍चसः ।।…अष्टांगसंग्रह
    वातदोषामुळे दात गरम वस्तूचा स्पर्श सहन करू शकत नाहीत, तसेच दातांना थंड स्पर्शही सहन होत नाही. थंड स्पर्शाने दातात तीव्र कळा येतात, त्याला “शीतोदालन’ असे म्हणतात.

    दन्तहर्ष
    दन्तहर्षप्रवाताम्लः शीतभक्षाक्षमाद्विजाः ।
    भवन्त्यम्लशनैनेव सरुजश्‍चलिता इव ।।…अष्टांगसंग्रह
    थंड हवा, आंबट चव व थंड खाद्य-पेय सहन न होणे. विशेषतः आंबट चवीमुळे दातात वेदना होणे व दात हलू लागणे, याला “दन्तहर्ष’ असे म्हणतात.

    दन्तभेद
    दन्तभेदेद्विजास्तोदभेदरुक्‌स्फुटनान्विताः ।…अष्टांगसंग्रह
    दातांमध्ये टोचल्याप्रमाणे, तोडल्याप्रमाणे तीव्र वेदना होत असल्यास त्यास “दंतभेद’ असे म्हणतात.

    दन्तचाल
    चालश्‍चलद्भिर्दर्शनैः भक्षणात्‌ अधिकव्यथैः ।…अष्टांगसंग्रह
    दात हलणे, काहीही खाल्ले असता दातात अधिक वेदना होणे याला “दंतचाल’ असे म्हणतात.

    दन्तशर्करा
    अधावनान्मलो दन्ते कफो वा वातशोषितः । पूतिगन्धिः स्थिरीभूतः शर्करा ।।
    दात नीट स्वच्छ न करण्याने किंवा वातामुळे कफदोष शुष्क झाल्याने दातावर किट्ट जमा होण्याला “दन्तशर्करा’ म्हणतात. यामध्ये मुखाला दुर्गंधी येते.

    कपालिका – दन्तशर्कराची पुढची अवस्था म्हणजे कपालिका.
    शातयत्युणुशोदन्तकपालानि कपालिका ।।
    …अष्टांगसंग्रह
    दन्तशर्करेकडे दुर्लक्ष झाल्यास त्यामुळे दाताची कणाकणाने झीज होते, त्याला “कपालिका’ असे म्हणतात.

    दन्तश्‍याव
    श्‍यावः श्‍यावत्वमायातो रक्‍तपित्तानिलर्द्विजः ।
    रक्‍त, पित्त व वायूमुळे दात काळे पडण्यास “दन्तश्‍याव’ म्हणतात.

    कृमिदन्तक
    समूलं दन्तमाश्रित्य दोषैरुल्बणमारुतैः ।
    शोषितेमज्ञिसुषिरे दन्ते।न्नमलपूरिते ।।
    पूतित्वात्‌ क्रिमयः सूक्ष्मा जायन्ते जायते ततः ।।
    मुख्य वातदोष व बरोबरीने पित्तदोष व कफदोष हे जेव्हा मुळासकट दाताचा आश्रय घेतात तेव्हा दातातील मज्जा धातू सुकतो. मज्जा धातू सुकल्याने दात ठिसूळ होतो, पोकळ होतो. या पोकळीत अन्न अडकून राहिले की ते तेथे सडते आणि मग त्या ठिकाणी सूक्ष्म कृमी तयार होतात.
    कृमिदन्तामुळे दातात तीव्र वेदना उत्पन्न होतात, कधी कधी या वेदना आपणहून शांतही होतात. यालाच सामान्य भाषेत दात किडणे असे म्हटले जाते.

    शीताद
    श्‍लेष्मरक्‍तेन पूतीनि वहन्त्यस्रमहेतुकम्‌ ।
    शीर्यन्ते दन्तमांसानि मृदुल्लिन्नासितानि च ।।
    कफ व रक्‍तदोष यांच्यातील बिघाडामुळे हिरड्या कोमल, संवेदनशील व काळ्या रंगाच्या होतात. याला “शीताद’ असे म्हणतात. यात हिरड्यांमधून रक्‍त व पू येतो.

    उपकुश
    उपकुशः पाकः पित्तासृक्‌ उद्भवः ।
    पित्त व रक्‍तामुळे हिरड्या पिकतात, त्याला “उपकुश’ असे म्हणतात. यामध्ये हिरड्यांची आग होते, हिरड्या लाल होऊन सुजतात, खाजतात, हिरड्यांमधून रक्‍त येते, दात हलू लागतात, तसेच मुखाला दुर्गंधी येते.

    सुषिर
    श्‍वयथुर्दन्तमूलेषु रुजावान्‌ रक्‍तपित्तजः ।
    लालास्रावी च सुषिरो दन्तमांसप्रशातनः ।।
    दातांच्या मुळाशी रक्‍त व पित्तातील दोषामुळे सूज येते, वेदना होतात, लाळ अधिक प्रमाणात सुटते व हळूहळू हिरड्या नष्ट होऊ लागतात, याला “सुषिर’ असे म्हणतात.

    दन्तनाडी
    दन्तमांसाश्रितान्‌ रोगान्‌ यः साध्यानप्युपेक्षते ।
    अन्तस्तस्यास्रवन्‌ दोषः सूक्ष्मांसञ्जनयेत्‌ गतिम्‌ ।।
    पूयं मुहुः सास्रवति त्वङ्‌मांसास्थिप्रभेदिनी ।
    जो मनुष्य दात व हिरड्यांच्या साध्या रोगांकडे दुर्लक्ष करतो, त्याचे दोष दातात आतपर्यंत जिरून सूक्ष्म नाडी उत्पन्न करतात. या नाडीतून वारंवार पू वाहतो. यामुळे हिरड्या व दातांची हळू हळू झीज होते.

    आदर्श दात व हिरड्या
    पूर्णता समता घनता शुक्‍लता स्निग्धता श्‍लक्ष्णता निर्मलता निरामयता किंचित उत्तरोन्नता दन्तबन्धनानां च समता रक्‍तता स्निग्धता बृहत्घनास्थिरमूलता चेति दन्तसंपदुच्यते ।।…काश्‍यप सूत्रस्थान
    *सर्व दात सारख्या उंचीचे असावेत.
    *पूर्ण वाढ झालेले, घट्ट व भरीव असावेत.
    *रंगाने शुभ्र असावेत.
    *स्पर्शाला स्निग्ध व गुळगुळीत असावेत.
    *दिसण्यास निर्मल व स्वच्छ असावेत.
    *निरोगी असावेत.
    *वरचे दात खालच्या दातांपेक्षा किंचित पुढे असावेत.
    *हिरड्या समतल, लाल, स्निग्ध, जाड, घट्ट व ज्यांच्यात दात घट्ट बसू शकतील अशा असाव्यात.
    आदर्श दात व हिरड्यांचे वर्णन केलेले असले तरी प्रत्येकाचे दात निरनिराळे असतात.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • च्यवनप्राश

    च्यवनप्राश

    च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते. च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे.

    चरकसंहितेमध्ये आवळ्यापासून बनविलेली निरनिराळी रसायने सांगताना सुरुवातीला सांगितलेले आहे,

    करत्रचितानां यथोक्‍तगुणानाम्‌ आमलकानां उद्‌धृनास्थ्नां
    शुष्कचूर्णितानां पुनर्मार्थे फाल्गुने वा मासे ।
    …चरक चिकित्सास्थान

    कार्तिक महिन्याच्या शेवटापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत जेव्हा आवळा आपल्या रस, वीर्याने परिपूर्ण झालेला असतो, तेव्हा झाडावरून हाताने तोडून गोळा करावा.

    याठिकाणी लक्षात घ्यायची मुख्य गोष्ट म्हणजे झाडावर उत्तम पोसला गेलेला, रस-वीर्याने परिपूर्ण झालेला आवळाच औषधात वापरणे अपेक्षित असते. पूर्ण वाढ होण्यापूर्वीच झाडावरून गळून पडलेले आवळे वापरणे योग्य नाही. याशिवाय उत्तम कसदार जमिनीमध्ये तयार झालेला, गंध, रूप व चव उत्तम असलेला, पुरेसा रस असलेला आवळाच रसायन म्हणून वापरण्यास योग्य असतो, असेही ग्रंथकार सांगतात.

    च्यवनप्राश तयार करताना पूर्ण तयार झालेला व रसरशीत आवळा वापरावा असे सांगितलेले असते, आवळ्याचे चूर्ण करायचे असले तर ताज्या आवळ्यातून बी काढून मग वाळवून चूर्ण करावे असे सांगितलेले असते.

    आवळ्याच्या दोन जाती असतात, मोठा आवळा व रान आवळा. मोठा आवळा चवीला आंबट, गोड, रसरशीत असतो व औषधात वापरला जातो. रान आवळे मात्र आकाराने लहान असून चवीला तुरट, कडवट व कोरडे असतात. हे आवळे औषधासाठी वापरणे योग्य नव्हे. रायआवळा म्हणून अतिशय आंबट छोटे फळ मिळते पण नावात साधर्म्य असले तरी त्याचा रसायन आवळ्याशी काही संबंध नसतो.

    आयुर्वेदात आमलकी, धात्री, वगैरे नावांनी ओळखला जाणारा आवळा हे एक सुलभतेने उपलब्ध असणारे उत्कृष्ट रसायनद्रव्य आहे.

    वृष्यं रसायनं रुच्यं त्रिदोषघ्नं विशेषतः ।
    वमनप्रमेहशोफपित्तास्र श्रमविबन्धाध्मान विष्टम्भघ्नम्‌ ।।
    …धन्वंतरी निघण्टु

    आवळा शुक्रधातूला पोषक, रसायन गुणांनी परिपूर्ण असतो, रुची वाढविणारा असतो; त्रिदोषांचे संतुलन करण्यास समर्थ असतो, विशेषतः पित्तदोषाचे शमन करतो; ताप, दाह, उलटी, प्रमेह, शोथ, रक्‍तपित्त, श्रम, मलावष्टंभ, पोटफुगी वगैरेंसाठी औषध म्हणून उपयुक्‍त असतो. “इदं वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌’ असेही चरकसंहितेमध्ये म्हटलेले आहे. वय वाढले तरी त्यामुळे होणारी शरीराची झीज कमीत कमी प्रमाणात व्हावी किंवा तारुण्य टिकविणारे द्रव्य म्हणजे वयःस्थापन द्रव्य होय. आवळा हा नुसते वयःस्थापन करतो असे नाही तर तो अशा प्रकारच्या द्रव्यात श्रेष्ठ, सर्वोत्तम समजला जातो, यावरूनच आवळ्याची महती लक्षात येते.

    म्हणूनच आवळा असंख्य रसायनांमध्ये प्रयुक्‍त केलेला आहे. च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते हे बहुतेक जणांना माहिती असते. आयुर्वेदाच्या संहितांमध्ये आमलकायस, ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अशी अनेक रसायने आहेत की जी मुख्यत्वे आवळ्यापासून तयार केलेली असतात. चरक, शारंगधर बहुतेक संहितांमध्ये च्यवनप्राश अवलेह वर्णन केलेला आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरलेली द्रव्ये तर उत्तम प्रतीची असावी लागतातच व बरोबरीने च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. च्यवनप्राश अतिशय प्रसिद्ध असल्याने आजकाल अनेक जण तो बनवितात, पण त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे.

    च्यवनप्राश बनविण्याची कृती
    1. रसरशीत ताजे आवळे निवडून पाण्याने स्वच्छ धुवावे व नंतर रात्रभर पाण्यात भिजत घालावेत (पाण्यात थोडेसे मीठ घालावे).
    2. सूचीतील 1 ते 33 द्रव्यांचे बारीक तुकडे करून रात्रभर पाण्यात भिजत घालावे.
    3. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवळे पाण्यातून काढून पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवावेत. सर्व आवळे सुती कापडात बांधून पोटली तयार करावी. भिजलेल्या सर्व वनस्पती पाण्यात कुस्करून घ्याव्यात.
    4. साधारण 20 लिटर पाणी घेऊन या सर्व वनस्पती त्यात घालून काढा बनविण्यासाठी मंद आचेवर ठेवणे. यावेळी आवळ्यांची पोटली अधांतरी लटकत ठेवावी.
    5. आवळे शिजल्यावर पोटली बाहेर काढून घ्यावी.
    6. एकीकडे मंद आचेवर काढा उकळणे सुरू ठेवावे.
    7. शिजलेल्या आवळ्यांमधून बिया काढून टाकाव्या.
    8. आवळ्याच्या फोडी 40 मेशच्या स्टेनलेस स्टीलच्या चाळणीवर अथवा सुती कपड्यावर घासून आवळ्याच्या गरातील धागे काढून टाकून बी-विरहित व धागेविरहित गर जमा करावा. या गरालाच मावा म्हणतात.
    9. योग्य आकाराच्या जाड बुडाच्या स्टेनलेस स्टीलच्या किंवा कल्हई असलेल्या पातेल्यात तेल व तुपावर मंद आचेवर पाण्याचा अंश उडून जाईपर्यंत मावा परतावा. यावेळी मावा करपणार नाही वा इकडे तिकडे उडणार नाही अशी काळजी घेणे आवश्‍यक असते.
    10. एका बाजूला काढा साधारण एक चतुर्थांश होईपर्यंत उकळावा.
    11. तयार झालेला काढा कापडातून गाळून घ्यावा व काढ्याची द्रव्ये बाजूला टाकून द्यावी.
    12. गाळलेला काढा साधारण घट्ट होईपर्यंत उकळवत ठेवावा.
    13. साखरेचा पाक करून घ्यावा.
    14. साखरेचा पाक, घट्ट केलेला काढा व आवळ्याचा परतलेला मावा एकत्र करून हे सर्व मिश्रण मंद आचेवर ठेवून चाटण-अवलेह होईपर्यंत ठेवावा. यावेळी अवलेह करपणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते.
    15. जवळ जवळ अवलेह तयार होत आला आहे असे वाटले की प्रक्षेप द्रव्ये घालावीत व सर्व मिश्रण एकजीव करावे.
    16. अवलेह साधारण गार झाल्यावर त्यात मध घालून नीट एकत्र करावे.
    17. च्यवनप्राशची गुणवत्ता व प्रभाव वाढविण्यासाठी सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख वसंतमालिनी, मकरध्वज वगैरे द्रव्ये मधात मिसळून टाकता येतात.
    18. तयार झालेला च्यवनप्राश योग्य आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवावा व आवश्‍यकतेप्रमाणे वर्षभर वापरावा.

    सूचना
    आवळे आम्ल रसाचे असल्यामुळे च्यवनप्राश बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत ऍल्युमिनियम वा हिंदालियमची भांडी, चमचे, झाकण्या वापरू नये.
    अशा प्रकारे तयार केलेला च्यवनप्राश दीर्घकाळ टिकू शकतो व रस या गुणांनी परिपूर्ण असतो. च्यवनप्राशची उपयुक्‍तता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याप्रकारे सांगितलेली आहे, मेधा, स्मृती, आकलनशक्‍ती चांगली राहते; कांती, वर्ण, त्वचा उजळते, तेजस्विता येते; मन प्रसन्न राहते; हृद्रोग, खोकला, दमा, तृष्णा, वातरक्‍त, उरोग्रह, शुक्रदोष, मूत्रदोष, विविध वात-पित्त विकारांवर च्यवनप्राश उपयुक्‍त असतो. रसायन म्हणून सेवन केल्यास मनुष्य अकाली वृद्धत्वापासून तसेच सर्व रोगांपासून दूर राहू शकतो.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे