Category: बाळाची काळजी

  • ‘बालगुटी’

    ‘बालगुटी’

    बाळाला दहाव्या दिवसापासून गुटी द्यायला सुरुवात करावी.  ‘बालगुटी’ हे आयुर्वेदिक शास्त्रावर आधारलेले व परंपरेने चालत आलेले सहस्त्रशः सिद्ध असे लहान आहे. याने बाळाचे पचन चांगले राहते. पोट रोज आणि नियमितपणे आफ व्हायला मदत मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने सर्दी, खोकला, तापासरखे छोटे छोटे त्रास होण्यास प्रतिबंध होतो. शरीराचे पोषण झाल्याने वजन वाढायला व एकंदर  आकस व्हायलाही मदत मिळते. बाळगुटीमधली द्रव्ये आईच्या दुधात उगाळून देणे सर्वात चांगले. अन्यथा वर उल्लेखलेल्या सुवर्णसिद्धजलात ती उगाळून द्यावीत. ही द्रव्ये अखंड असावीत आणि उगाळून झाल्यावर नीट पुसून कोरडी कायु  हवाबंद डब्यात ठेवावीत. बाळगुटी पहिले आठ महिने द्यावीच द्यावी. मात्र नंतरही शक्य असल्यास वर्ष- सव्वा वर्षापर्यंत गुटी देणे बाळाच्या एकंदर आरोग्य आणि विकासाच्या दृष्टीने उत्तम होय. बालगुटीमध्ये पचन सुधारणारी, मेंदूची ताकद वाढवणारी, जंतांची प्रवृत्ती कमी करणारी, हाडांना बळकट करणारी अशी विविध प्रकारची द्रव्ये असतात.  दहा दिवसांच्या बाळाला गुटी सुरू करताना प्रत्येक द्रव्याचे साधारणतः रुपयाच्या आकाराचे एक-दोन वळसे द्यावेत. बालक महिन्याचे झाल्यावर दोन-तीन वळसे द्यावेत, ५-६ महिन्यांचे होईपर्यंत सात- आठ वळसे द्यावेत व या प्रकारे हळू हळू वळश्यांचे प्रमाण प्रमाण वाढवत न्यावेत. बालकाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत असल्यास त्यावर उपयोगी असणाऱ्या द्रव्याची मात्रा त्याला बरे वाटेपर्यंत थोडीफार वाढवावी.

    बाळगुटीत साधारणतः मुरुडशेंग, हिरडा, पिंपळी, बेहडा, हळद, सागरगोटा, वेखंड, जायफळ, कायफळ, मायफळ, सुंठ, काकडशिंगी, ज्येष्ठमध, डिकेमाली, वावडिंग, अतिविषा, नागरमोथा, कुडा, अश्वगंधा, खारीक व बदाम ही द्रव्ये असतात. याची सविस्तर माहिती परिशिष्टात दिलेली आहे.सर्व द्रव्ये असलेला बालगुटीचा संच बाजारात उपलब्ध असतो, मात्र ती सर्व द्रव्ये चांगल्या प्रतीची आहेत याची खात्री करावी., तसेच बाजारात सर्व द्रव्ये एकत्र करून बनवलेली तयार बाळगुटीदेखील मिळते, मात्र अशी तयार बाळगुटी वापरण्यापेक्षा वेगवेगळी द्रव्ये घेऊन उगाळणे सर्वात चांगले. कारण बाळाला असलेल्या त्रासाप्रमाणे द्रव्यांची मात्रा कमी-अधिक करता येते, जे एकत्र केलेल्या गुटीत शक्य नसते. या एकत्रित गुटीबरोबर बदाम, खारीक उगाळून देणे आवश्यक असते.बालक बुद्धीसंपन्न व प्रज्ञासंपन्न होण्यासाठी ब्राह्मी, जटामांसी वगैरे मेंदूला पोषक औषधांनी सिद्ध केलेले ‘ब्रह्मलीन घृता’चे लेहन देणेही उत्तम. यात चवीसाठी दोन थेंब मध घातला तरी चालू शकते.बाळाला दात नसल्याने ही सर्व लेह्य औषधे फार उपयोगी पडतात. जसजसे बाळाला दात यायला लागतात, तसतसे बाळाच्या आहार आणि औषधांचे स्वरूप थोडे बदलायला लागते.

    blog icon_1

    अगदी लहान बाळांची पचन शक्ती सुद्धा शिशु अवस्थेत असते. बाळगुटीमुळे बाळाची पचनक्रिया चांगली राहाते.

    blog icon_2

    बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी पोट रोज आणि नियमितपणे राहणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे बाळाचे पोट नियमितपणे साफ व्हायला मदत होते.

    blog icon_3

    बाळगुटीमुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे सर्दी, खोकला व ताप येणे आदी छोटे छोटे त्रास होण्यापासून बाळाचे संरक्षण होते.

    blog icon_4

    बाळगुटीमुळे बाळाच्या शरीराचे उत्तम पोषण होते. त्यामुळे एकंदर विकास होण्यासाठी मदत होते.

    blog icon_5

    बाळाच्या विकासात बाळाचे योग्य वजन वाढणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे हे साध्य होते.

    blog icon_6

    बाळगुटीमुळे बाळाच्या सर्वांगीण विकासात मदत होते.

    blog icon_7

    बाळगुटीमुळे मेंदूचा विकास व बाळाची बौद्धिक वाढ होण्यास मदत होते.

    blog icon_8

    बाळगुटी मध्ये बाळाच्या हाडांना बळकटी देणारी द्रव्ये असतात. त्यामुळे बाळाच्या हाडांचा सुयोग्य विकास होतो

    post_9A
    post_10B
    post_26
    post_27
  • बेबी मसाज पावडर

    बेबी मसाज पावडर

    अभ्यंग – बाळाला रोज तेलाचा अभ्यंग करावा. यासाठी औषधांनी सिद्ध केलेले ‘संतुलन बेबी मसाज तेल’ उत्तम ठरते. सकाळी अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला हलक्या हाताने तेल लावावे. तेल लावताना फार जोर लावू नये, रगडण्यामुळे किंवा फार जोर दिल्याने बाळाला त्रास होऊ शकतो. बाळाला खेळवत हळुवार हातांनी व मायेेने तेल लावल्यास बाळालाही तेल लावून घेणे आवडते. बाळाला पायावर घेऊन तेल लावणे सगळ्यात सोपे असते, मात्र तसे न जमल्यास त्याला मऊ दुपट्यावर ठेवून तेल लावले तरी चालते.

    सर्वप्रथम, व्यवस्थित जिरेल अशा पद्धतीने टाळूवर तेल थापावे. नाभीमध्ये दोन-तीन थेंब तेल सोडावे, तसेच कानामध्ये प्रत्येकी दोन-तीन थेंब टाकावेत. तेल लावण्याची सुरुवात पायापासून करावी आणि तेल लावताना पायाच्या तळव्यापासून वर मांडीपर्यंत, हाताच्या तळव्यापासून वर दंडापर्यंत याप्रमाणे दिशा ठेवावी. पाठीसही खालून वर व पोटावर घड्याळाच्या दिशेने गोलाकार हात फिरवीत तेल लावावे. तेल कोमट असलेले चांगले. किमान पावसाळ्यात व हिवाळ्यात तरी तेल कोमट करूनच वापरावे. तेल लावल्यावर बाळाला साधारणपणे अर्ध्या तासानंतर अंघोळ घालावी. याप्रकारे नियमित अभ्यंग केल्यास बाळाची हाडे व स्नायू बळकट व्हायला मदत होते; त्वचा कोमल आणि सतेज होते; शरीराची वाढ व्यवस्थित होते; एकंदर प्रतकारशक्ती वाढते आणि झोप शांत यायलाही मदत मिळते. विशेषतः संध्याकाळी पुन्हा एकदा तेल लावल्याने शांत झोप यायला मदत मिळते.

    खरे तर बाळाला पहिली दोन वर्षे नियमित अभ्यंग करणे चांगले; पण किमान पहिले आठ-नऊ महिने तरी रोज अभ्यंग करावा. नंतरही पाच वर्षांपर्यंत आठवड्यातून एक-दोन वेळा अभ्यंग करणे चांगले.

    बाळाच्या अंघोळीचे पाणी फार गरम किंवा फार गार नसावे. बाळाची त्वचा नाजूक आणि अतिशय संवेदनशील असल्याने साबणाऐवजी उटणे लावणे अधिक चांगले. चंदन, अनंतमूळ, हळद, बेसन किंवा मसुराचे पीठ यांचे वस्त्रगाळ मिश्रण किंवा तयार ‘संतुलन बेबी मसाज पावडर’ साय किंवा दुधात मिसळून अंघोळीच्या वेळेला बाळाच्या अंगाला लावावी. अभ्यंग करताना, तसेच बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या अंगावर वाऱ्याचा झोत येणार नाही याकडे लक्ष ठेवावे. अंघोळ झाल्यावर लगेच मऊ सुती वस्त्राने बाळाचे अंग हलक्या हाताने टिपून घ्यावे.

    संतुलन बेबी मसाज पावडर – बाळाच्या कोमल व नाजूक त्वचेची काळजी घेण्यासाठी हे खास उटणे आहे. अनंतमूळ, गुलाबाच्या पाकळ्या, चंदन व जातकर्मसंस्कारात सांगितलेल्या अष्टगंधातील काही खास द्रव्यांपासून तयार केलेले हे उटणे स्नानाच्या वेळेला साय किंवा दुधात मिसळून बाळाच्या अंगाला लावावे (साबणाऐवजी). याच्या नियमित वृापराने त्वचा उजळते, पुरळ, रॅश, ॲलर्जी वगैरे त्रास होत नाहीत. तसेच साबणातील रासायनिक द्रव्यांमुळे होऊ शकणारा अपाय टाळता येतो.

  • बाळाला करावयाचा मसाज

    बाळाला करावयाचा मसाज

    अभ्यंग – बाळाला रोज तेलाचा अभ्यंग करावा. यासाठी औषधांनी सिद्ध केलेले ‘संतुलन बेबी मसाज तेल’ उत्तम ठरते. सकाळी अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला हलक्या हाताने तेल लावावे. तेल लावताना फार जोर लावू नये, रगडण्यामुळे किंवा फार जोर दिल्याने बाळाला त्रास होऊ शकतो. बाळाला खेळवत हळुवार हातांनी व मायेेने तेल लावल्यास बाळालाही तेल लावून घेणे आवडते. बाळाला पायावर घेऊन तेल लावणे सगळ्यात सोपे असते, मात्र तसे न जमल्यास त्याला मऊ दुपट्यावर ठेवून तेल लावले तरी चालते.

    सर्वप्रथम, व्यवस्थित जिरेल अशा पद्धतीने टाळूवर तेल थापावे. नाभीमध्ये दोन-तीन थेंब तेल सोडावे, तसेच कानामध्ये प्रत्येकी दोन-तीन थेंब टाकावेत. तेल लावण्याची सुरुवात पायापासून करावी आणि तेल लावताना पायाच्या तळव्यापासून वर मांडीपर्यंत, हाताच्या तळव्यापासून वर दंडापर्यंत याप्रमाणे दिशा ठेवावी. पाठीसही खालून वर व पोटावर घड्याळाच्या दिशेने गोलाकार हात फिरवीत तेल लावावे. तेल कोमट असलेले चांगले. किमान पावसाळ्यात व हिवाळ्यात तरी तेल कोमट करूनच वापरावे. तेल लावल्यावर बाळाला साधारणपणे अर्ध्या तासानंतर अंघोळ घालावी. याप्रकारे नियमित अभ्यंग केल्यास बाळाची हाडे व स्नायू बळकट व्हायला मदत होते; त्वचा कोमल आणि सतेज होते; शरीराची वाढ व्यवस्थित होते; एकंदर प्रतकारशक्ती वाढते आणि झोप शांत यायलाही मदत मिळते. विशेषतः संध्याकाळी पुन्हा एकदा तेल लावल्याने शांत झोप यायला मदत मिळते.

    खरे तर बाळाला पहिली दोन वर्षे नियमित अभ्यंग करणे चांगले; पण किमान पहिले आठ-नऊ महिने तरी रोज अभ्यंग करावा. नंतरही पाच वर्षांपर्यंत आठवड्यातून एक-दोन वेळा अभ्यंग करणे चांगले.

    बाळाच्या अंघोळीचे पाणी फार गरम किंवा फार गार नसावे. बाळाची त्वचा नाजूक आणि अतिशय संवेदनशील असल्याने साबणाऐवजी उटणे लावणे अधिक चांगले. चंदन, अनंतमूळ, हळद, बेसन किंवा मसुराचे पीठ यांचे वस्त्रगाळ मिश्रण किंवा तयार ‘संतुलन बेबी मसाज पावडर’ साय किंवा दुधात मिसळून अंघोळीच्या वेळेला बाळाच्या अंगाला लावावी. अभ्यंग करताना, तसेच बाळाला अंघोळ घालताना बाळाच्या अंगावर वाऱ्याचा झोत येणार नाही याकडे लक्ष ठेवावे. अंघोळ झाल्यावर लगेच मऊ सुती वस्त्राने बाळाचे अंग हलक्या हाताने टिपून घ्यावे.

    संतुलन बेबी मसाज तेल – अनेक औषधी द्रव्यांचा संस्कार करून सिद्ध केलेले खास तेल. शतावरी, अनंतमूळ, शटी, जटामांसी, मंजिष्ठा अशा विविध शरीरपोषक वनस्पतींबरोबर सिद्ध केलेले हे तेल बालकांना रोज अभ्यंग करण्यासाठी तसेच टाळू भरण्यासाठी उत्तम असते. बालकाच्या कोमल त्वचेचे संरक्षण करण्यासाठी, उजळ सांतीसाठी, प्रतिकारशक्ती उत्तम होण्यासाठी व बालकांच्या एकंदर विकासाला हातभार लावण्यासाठी उत्कृष्ट उत्पादन.

    blog icon_1
    हाडे व स्नायू बळकटी – संतुलन तेलाने बाळाला रोज अभ्यंग केल्याने बाळाच्या स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते.
    blog icon_2

    कोमल आणि सतेज त्वचा – बाळाची त्वचा मुळातच नाजूक असते. तेलाने नियमित मालिश केल्याने बाळाची कोमल त्वचा सतेज होण्यास मदत होते..

    blog icon_3

    शरीराची वाढ – बाळाच्या रोजच्या अभ्यंगाने हाडांची आणि शरीराची वाढ व्यवस्थित होते.

    blog icon_4

    प्रतिकारशक्ती – संतुलन तेलाच्या नियमित अभ्यंगाने स्नायूंना बळकटी मिळून बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यास पण मदत होते.

    blog icon_5

    शांत झोप – लहान बाळ जितके जास्त वेळ शांत झोपेल तितके ते सुदृढ असते. ह्या अभ्यंगाने बाळाला शांत झोप लागते.

    post_9A
    post_10B
    post_26
    post_27
  • बाल अमृत

    बाल अमृत

    बाळासाठी सुवर्णप्राशन –  बालामृत!!

    आयुर्वेदाने बाळाला आरोग्यरक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी मध, दूध वगैरे द्रव्यांमध्ये विशेष द्रव्ये उगाळून किंवा मिसळून ‘चाटण’ चाटवायला सांगितले आहे. या औषधांना ‘लेह्य’ औषधे असे म्हणतात व ती बालकाला रोज चाटवायची असतात.

    जन्मानंतर लगेच बालकाला सोने चाटवण्यासंबंधी आपण यापूर्वी पाहिले होतेच. काश्‍यपसंहितेत बाळाला सहा महिन्यांपर्यंत सोन्याचे चाटण द्यायला सांगितले आहे.

    सुवर्णप्राशनं ह्येतन्मेधाग्निबलवर्धनम्‌ ।
    आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम्‌ ॥

    मासात्‌ परममेधावी व्याधिभिर्न च धृष्यते ।
    षड्भिर्मासैः श्रुतधरः सुवर्णप्राशनाद्‌ भवेत्‌ ॥…काश्‍यपसंहिता

    स्वच्छ धुतलेल्या सहाणेवर २-३ थेंब मधात सोन्याचे वळसे घ्यावेत व ते मध बोटाने बाळाच्या जिभेवर चाटवावे. याकरता २४ कॅरटचे वापरात नसलेले वेढणे किंवा १-२ ग्रॅमचे बिस्कीट वापरता येते (रोज बोटात घालायची अंगठी, मणी वगैरे घेऊ नये). साधारण रुपयाच्या आकाराचे, गोलाकार घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने २-३  किंवा मधाचा रंग किंचित बदलेपर्यंत सोन्याचे वळसे घ्यावेत. याप्रमाणे रोज एकदा न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी सोने चाटवावे. शक्यतो ठरवलेली वेळ रोज पाळावी. यामुळे बालकाची मेधा, बुद्धी, अग्नी व बल वाढते, बालक दीर्घायुषी होण्यास मदत मिळते.

    सोने चाटवण्याची क्रिया मंगलदायक, पुण्यकारक असते, तसेच यामुळे कोणत्याही प्रकारची ग्रहबाधा (पूर्वी पाहिल्याप्रमाणे यात निरनिराळ्या जिवाणू-विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांचाही समावेश होतो) होण्यास प्रतिबंध होतो असे काश्‍यपाचार्यांनी सांगितले आहे. याप्रकारे महिनाभर नियमित सोने चाटवल्यास बालकाची आकलनशक्ती वाढते व त्याला सहसा कोणताही रोग होत नाहीत तर सहा महिन्यांपर्यंत नियमित चाटवल्यास बालक एकदा ऐकलेले लक्षात ठेवू शकेल इतके हुशार होते, असेही ते पुढे सांगतात.

    केशर, सोने, शतावरी, गुळवेल, खडीसाखर वगैरे आयुर्वेदिक द्रव्यांपासून बनवलेले ‘बालामृत’ हे  तयार औषध बाळाला १० दिवसांपासून ते २ वर्षांचे होईपर्यंत मधाबरोबर चाटवल्यास अमृताप्रमाणे उपयुक्त ठरते. १-२ थेंब मधात छोटी चिमूटभर ‘बालामृत’ दिवसातून एकदा नियमित चाटवावे.

    ‘संतुलन बालामृत’ म्हणजे २४ कॅरेट सोने आणि काश्मिरी केशराणे मिळून केलेली तुमच्या बाळाची जोपासना.सोने शरीर व बुद्धीच्या विकासासाठी, पचन व प्रतिकार शक्तीच्या वृद्धीसाठी तर केशर तेजस्वी वर्णासाठी, कृमी निवारण आणि त्रिदोषांच्या संतुलनासाठी उपयोगी ठरते. यासोबतच अनेक प्रभावी वनौषधींनी बनवलेले संतुलन बालामृत बाळाला मायेच्या हाताने चाटवायचे ते गोड मधातून किंवा दुधातून. दोन वर्षांपर्यंतच्या बाळांसाठी संतुलन बालामृत हा आयुर्वेदिक सुवर्णप्राशन संस्कार. संतुलन बालामृत म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुमच्या बाळाला दिलेले आरोग्य कवच!

    यामुळे बाळ कुशाग्र बुद्धीने युक्त, आरोग्यसंपन्न व तेजस्वी व्हायला मदत मिळते. याचीही वेळ नियमित ठेवलेली चांगली. प्रत्यक्षातही पाहण्यात येते की, १० व्या दिवसापासून नियमित बालामृत घेतलेली मुले सहसा आजारी पडत नाहीत, अकारण किंवा फारशी रडत नाहीत, उलट हसरी व लक्षवेधी होतात, त्यांचा एकंदर विकासही लक्षणीय असतो.

    blog icon_1

    अगदी लहान बाळांची पचन शक्ती सुद्धा शिशु अवस्थेत असते. बाळगुटीमुळे बाळाची पचनक्रिया चांगली राहाते.

    blog icon_2

    बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी पोट रोज आणि नियमितपणे राहणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे बाळाचे पोट नियमितपणे साफ व्हायला मदत होते.

    blog icon_3

    बाळगुटीमुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे सर्दी, खोकला व ताप येणे आदी छोटे छोटे त्रास होण्यापासून बाळाचे संरक्षण होते.

    blog icon_4

    बाळगुटीमुळे बाळाच्या शरीराचे उत्तम पोषण होते. त्यामुळे एकंदर विकास होण्यासाठी मदत होते.

    blog icon_5

    बाळाच्या विकासात बाळाचे योग्य वजन वाढणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे हे साध्य होते.

    blog icon_6

    बाळगुटीमुळे बाळाच्या सर्वांगीण विकासात मदत होते

    blog icon_7

    बाळगुटीमुळे मेंदूचा विकास व बाळाची बौद्धिक वाढ होण्यास मदत होते.

    blog icon_8

    बाळगुटी मध्ये बाळाच्या हाडांना बळकटी देणारी द्रव्ये असतात. त्यामुळे बाळाच्या हाडांचा सुयोग्य विकास होतो.

    post_9A
    post_10B
    post_26
    post_27