बाळासाठी सुवर्णप्राशन – बालामृत!!
आयुर्वेदाने बाळाला आरोग्यरक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी मध, दूध वगैरे द्रव्यांमध्ये विशेष द्रव्ये उगाळून किंवा मिसळून ‘चाटण’ चाटवायला सांगितले आहे. या औषधांना ‘लेह्य’ औषधे असे म्हणतात व ती बालकाला रोज चाटवायची असतात.
जन्मानंतर लगेच बालकाला सोने चाटवण्यासंबंधी आपण यापूर्वी पाहिले होतेच. काश्यपसंहितेत बाळाला सहा महिन्यांपर्यंत सोन्याचे चाटण द्यायला सांगितले आहे.
सुवर्णप्राशनं ह्येतन्मेधाग्निबलवर्धनम् ।
आयुष्यं मंगलं पुण्यं वृष्यं वर्ण्यं ग्रहापहम् ॥
मासात् परममेधावी व्याधिभिर्न च धृष्यते ।
षड्भिर्मासैः श्रुतधरः सुवर्णप्राशनाद् भवेत् ॥…काश्यपसंहिता
स्वच्छ धुतलेल्या सहाणेवर २-३ थेंब मधात सोन्याचे वळसे घ्यावेत व ते मध बोटाने बाळाच्या जिभेवर चाटवावे. याकरता २४ कॅरटचे वापरात नसलेले वेढणे किंवा १-२ ग्रॅमचे बिस्कीट वापरता येते (रोज बोटात घालायची अंगठी, मणी वगैरे घेऊ नये). साधारण रुपयाच्या आकाराचे, गोलाकार घडाळ्याच्या काट्याच्या दिशेने २-३ किंवा मधाचा रंग किंचित बदलेपर्यंत सोन्याचे वळसे घ्यावेत. याप्रमाणे रोज एकदा न चुकता सकाळी किंवा संध्याकाळी सोने चाटवावे. शक्यतो ठरवलेली वेळ रोज पाळावी. यामुळे बालकाची मेधा, बुद्धी, अग्नी व बल वाढते, बालक दीर्घायुषी होण्यास मदत मिळते.
सोने चाटवण्याची क्रिया मंगलदायक, पुण्यकारक असते, तसेच यामुळे कोणत्याही प्रकारची ग्रहबाधा (पूर्वी पाहिल्याप्रमाणे यात निरनिराळ्या जिवाणू-विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांचाही समावेश होतो) होण्यास प्रतिबंध होतो असे काश्यपाचार्यांनी सांगितले आहे. याप्रकारे महिनाभर नियमित सोने चाटवल्यास बालकाची आकलनशक्ती वाढते व त्याला सहसा कोणताही रोग होत नाहीत तर सहा महिन्यांपर्यंत नियमित चाटवल्यास बालक एकदा ऐकलेले लक्षात ठेवू शकेल इतके हुशार होते, असेही ते पुढे सांगतात.
केशर, सोने, शतावरी, गुळवेल, खडीसाखर वगैरे आयुर्वेदिक द्रव्यांपासून बनवलेले ‘बालामृत’ हे तयार औषध बाळाला १० दिवसांपासून ते २ वर्षांचे होईपर्यंत मधाबरोबर चाटवल्यास अमृताप्रमाणे उपयुक्त ठरते. १-२ थेंब मधात छोटी चिमूटभर ‘बालामृत’ दिवसातून एकदा नियमित चाटवावे.
‘संतुलन बालामृत’ म्हणजे २४ कॅरेट सोने आणि काश्मिरी केशराणे मिळून केलेली तुमच्या बाळाची जोपासना.सोने शरीर व बुद्धीच्या विकासासाठी, पचन व प्रतिकार शक्तीच्या वृद्धीसाठी तर केशर तेजस्वी वर्णासाठी, कृमी निवारण आणि त्रिदोषांच्या संतुलनासाठी उपयोगी ठरते. यासोबतच अनेक प्रभावी वनौषधींनी बनवलेले संतुलन बालामृत बाळाला मायेच्या हाताने चाटवायचे ते गोड मधातून किंवा दुधातून. दोन वर्षांपर्यंतच्या बाळांसाठी संतुलन बालामृत हा आयुर्वेदिक सुवर्णप्राशन संस्कार. संतुलन बालामृत म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुमच्या बाळाला दिलेले आरोग्य कवच!
यामुळे बाळ कुशाग्र बुद्धीने युक्त, आरोग्यसंपन्न व तेजस्वी व्हायला मदत मिळते. याचीही वेळ नियमित ठेवलेली चांगली. प्रत्यक्षातही पाहण्यात येते की, १० व्या दिवसापासून नियमित बालामृत घेतलेली मुले सहसा आजारी पडत नाहीत, अकारण किंवा फारशी रडत नाहीत, उलट हसरी व लक्षवेधी होतात, त्यांचा एकंदर विकासही लक्षणीय असतो.

अगदी लहान बाळांची पचन शक्ती सुद्धा शिशु अवस्थेत असते. बाळगुटीमुळे बाळाची पचनक्रिया चांगली राहाते.

बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी पोट रोज आणि नियमितपणे राहणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे बाळाचे पोट नियमितपणे साफ व्हायला मदत होते.

बाळगुटीमुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे सर्दी, खोकला व ताप येणे आदी छोटे छोटे त्रास होण्यापासून बाळाचे संरक्षण होते.

बाळगुटीमुळे बाळाच्या शरीराचे उत्तम पोषण होते. त्यामुळे एकंदर विकास होण्यासाठी मदत होते.

बाळाच्या विकासात बाळाचे योग्य वजन वाढणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे हे साध्य होते.

बाळगुटीमुळे बाळाच्या सर्वांगीण विकासात मदत होते

बाळगुटीमुळे मेंदूचा विकास व बाळाची बौद्धिक वाढ होण्यास मदत होते.

बाळगुटी मध्ये बाळाच्या हाडांना बळकटी देणारी द्रव्ये असतात. त्यामुळे बाळाच्या हाडांचा सुयोग्य विकास होतो.






Leave a Reply