‘बालगुटी’

बाळाला दहाव्या दिवसापासून गुटी द्यायला सुरुवात करावी.  ‘बालगुटी’ हे आयुर्वेदिक शास्त्रावर आधारलेले व परंपरेने चालत आलेले सहस्त्रशः सिद्ध असे लहान आहे. याने बाळाचे पचन चांगले राहते. पोट रोज आणि नियमितपणे आफ व्हायला मदत मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने सर्दी, खोकला, तापासरखे छोटे छोटे त्रास होण्यास प्रतिबंध होतो. शरीराचे पोषण झाल्याने वजन वाढायला व एकंदर  आकस व्हायलाही मदत मिळते. बाळगुटीमधली द्रव्ये आईच्या दुधात उगाळून देणे सर्वात चांगले. अन्यथा वर उल्लेखलेल्या सुवर्णसिद्धजलात ती उगाळून द्यावीत. ही द्रव्ये अखंड असावीत आणि उगाळून झाल्यावर नीट पुसून कोरडी कायु  हवाबंद डब्यात ठेवावीत. बाळगुटी पहिले आठ महिने द्यावीच द्यावी. मात्र नंतरही शक्य असल्यास वर्ष- सव्वा वर्षापर्यंत गुटी देणे बाळाच्या एकंदर आरोग्य आणि विकासाच्या दृष्टीने उत्तम होय. बालगुटीमध्ये पचन सुधारणारी, मेंदूची ताकद वाढवणारी, जंतांची प्रवृत्ती कमी करणारी, हाडांना बळकट करणारी अशी विविध प्रकारची द्रव्ये असतात.  दहा दिवसांच्या बाळाला गुटी सुरू करताना प्रत्येक द्रव्याचे साधारणतः रुपयाच्या आकाराचे एक-दोन वळसे द्यावेत. बालक महिन्याचे झाल्यावर दोन-तीन वळसे द्यावेत, ५-६ महिन्यांचे होईपर्यंत सात- आठ वळसे द्यावेत व या प्रकारे हळू हळू वळश्यांचे प्रमाण प्रमाण वाढवत न्यावेत. बालकाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत असल्यास त्यावर उपयोगी असणाऱ्या द्रव्याची मात्रा त्याला बरे वाटेपर्यंत थोडीफार वाढवावी.

बाळगुटीत साधारणतः मुरुडशेंग, हिरडा, पिंपळी, बेहडा, हळद, सागरगोटा, वेखंड, जायफळ, कायफळ, मायफळ, सुंठ, काकडशिंगी, ज्येष्ठमध, डिकेमाली, वावडिंग, अतिविषा, नागरमोथा, कुडा, अश्वगंधा, खारीक व बदाम ही द्रव्ये असतात. याची सविस्तर माहिती परिशिष्टात दिलेली आहे.सर्व द्रव्ये असलेला बालगुटीचा संच बाजारात उपलब्ध असतो, मात्र ती सर्व द्रव्ये चांगल्या प्रतीची आहेत याची खात्री करावी., तसेच बाजारात सर्व द्रव्ये एकत्र करून बनवलेली तयार बाळगुटीदेखील मिळते, मात्र अशी तयार बाळगुटी वापरण्यापेक्षा वेगवेगळी द्रव्ये घेऊन उगाळणे सर्वात चांगले. कारण बाळाला असलेल्या त्रासाप्रमाणे द्रव्यांची मात्रा कमी-अधिक करता येते, जे एकत्र केलेल्या गुटीत शक्य नसते. या एकत्रित गुटीबरोबर बदाम, खारीक उगाळून देणे आवश्यक असते.बालक बुद्धीसंपन्न व प्रज्ञासंपन्न होण्यासाठी ब्राह्मी, जटामांसी वगैरे मेंदूला पोषक औषधांनी सिद्ध केलेले ‘ब्रह्मलीन घृता’चे लेहन देणेही उत्तम. यात चवीसाठी दोन थेंब मध घातला तरी चालू शकते.बाळाला दात नसल्याने ही सर्व लेह्य औषधे फार उपयोगी पडतात. जसजसे बाळाला दात यायला लागतात, तसतसे बाळाच्या आहार आणि औषधांचे स्वरूप थोडे बदलायला लागते.

 

blog icon_1

अगदी लहान बाळांची पचन शक्ती सुद्धा शिशु अवस्थेत असते. बाळगुटीमुळे बाळाची पचनक्रिया चांगली राहाते.

blog icon_2

बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी पोट रोज आणि नियमितपणे राहणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे बाळाचे पोट नियमितपणे साफ व्हायला मदत होते.

blog icon_3

बाळगुटीमुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे सर्दी, खोकला व ताप येणे आदी छोटे छोटे त्रास होण्यापासून बाळाचे संरक्षण होते.

blog icon_4

बाळगुटीमुळे बाळाच्या शरीराचे उत्तम पोषण होते. त्यामुळे एकंदर विकास होण्यासाठी मदत होते.

blog icon_5

बाळाच्या विकासात बाळाचे योग्य वजन वाढणे आवश्यक असते. बाळगुटी मुळे हे साध्य होते.

blog icon_6

बाळगुटीमुळे बाळाच्या सर्वांगीण विकासात मदत होते.

blog icon_7

बाळगुटीमुळे मेंदूचा विकास व बाळाची बौद्धिक वाढ होण्यास मदत होते.

blog icon_8

बाळगुटी मध्ये बाळाच्या हाडांना बळकटी देणारी द्रव्ये असतात. त्यामुळे बाळाच्या हाडांचा सुयोग्य विकास होतो

post_9A
post_10B
post_26
post_27

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *